जेव्हा नाईट ड्रेस घातलेला गोविंदा राणी मुखर्जीच्या बेडरूममधून बाहेर पडतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:33 AM2017-10-06T09:33:04+5:302017-10-06T16:03:19+5:30
हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा ...
ह कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षांचे नाते होते. पण गोविंदाच्या स्वभावामुळे राणी त्याच्यावर फिदा झाली आणि त्याच्याच प्रेमप्रकरण सुरू झाले असे म्हटले जाते. हद कर दी आपने या चित्रपटाचे चित्रीकरण स्विर्त्झलँड आणि अमेरिकेत सुरू असताना अनेकवेळा ते एकमेकांसोबत वेळ घालवत असत. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा मीडियात चांगलीच रंगली होती.
हद कर दी आपनी या चित्रपटाच्या वेळी राणी ही बॉलिवूडमध्ये खूपच नवीन होती तर गोविंदाने तोपर्यंत एक यशस्वी अभिनेता म्हणून आपले नाव कमावले होते. गोविंदाच्या नावावरच चित्रपट चालत असत. त्यामुळे इंडस्ट्रीत त्याच्या नावाचा प्रचंड दबदबा होता. त्यामुळे राणीला चित्रपटात घेण्यासाठी तो निर्माते, दिग्दर्शक यांना सांगत असे. गोविंदाने राणीला अनेक चित्रपट मिळवून दिले असे म्हटले जाते.
हद कर दी आपने या चित्रपटाच्यावेळी गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले असून त्याला दोन मुलेदेखील होती. त्यामुळे ही गोष्ट सुनीताला कळू नये यासाठी गोविंदा अनेक प्रयत्न करत होता. त्यामुळे तो आणि राणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न भेटता अनेकवेळा राणीच्या वर्सोव्याच्या फ्लॅटमध्ये भेटत असत. या फ्लॅटमध्येच त्यांना एक पत्रकाराने एकत्र पाहिले होते.
एमटिव्ही इंडिया या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार राणी मुखर्जीची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार तिच्या घरी गेली होती. त्यावेळी राणीच्या रूममधून अचानक गोविंदा बाहेर आला. त्यावेळी त्याने नाइट ड्रेस घातला होता. यानंतर राणी आणि गोविंदाच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा सगळीकडे रंगली होती.
पण राणीने दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. तिने म्हटले होते की, गोविंदासोबत एखाद्या अभिनेत्रीने तीन-चार चित्रपटांत काम केले की, त्या अभिनेत्रीचे नाव गोविंदासोबत जोडले जाते हे आपण अनेक वर्षांपासून पाहात आहोत. तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे.
Also Read : पुन्हा एकदा गोविंदा बनणार राजाबाबू; ‘या’ चित्रपटात झळकणार!