राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर एसी दुरुस्त करायला गेले होते इरफान खान, या गोष्टीमुळे झाले होते निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 17:20 IST2021-05-27T17:17:33+5:302021-05-27T17:20:05+5:30

इरफान खान हे राजेश खन्ना यांचे खूप मोठे फॅन होते. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांनी चक्क त्यांचे घर गाठले होते. त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

When Irrfan went to Rajesh Khanna's home to fix his AC | राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर एसी दुरुस्त करायला गेले होते इरफान खान, या गोष्टीमुळे झाले होते निराश

राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर एसी दुरुस्त करायला गेले होते इरफान खान, या गोष्टीमुळे झाले होते निराश

ठळक मुद्देइरफान यांनी पुढे सांगितले होते की, राजेश खन्ना यांना मिळालेले स्टारडम कोणत्याच कलाकाराला कधीच मिळाले नाही.

राजेश खन्ना यांना सुपरस्टार म्हटले जाते. त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन आहेत. त्यांची एक झलक पाहायला मिळावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असायची. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या परिसरात अनेक चाहते गर्दी करायचे. इरफान खान हे राजेश खन्ना यांचे खूप मोठे फॅन होते. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांनी चक्क त्यांचे घर गाठले होते.

इरफान खान यांनी त्याच्या करियरच्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच ते इलेक्ट्रीशन म्हणून देखील काम करत होते. इरफान यांना राजेश खन्ना यांना एकदा तरी भेटायचे होते. त्यामुळे त्यांच्या घराचे एसी दुरुस्तीचे काम त्यांनी मिळवले होते. याविषयी इरफान यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, राजेश खन्ना यांच्या बंगल्यात एसी दुरुस्त करायचे हे कळल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता. मी दुरुस्तीसाठी लागणारे सगळे सामान गोळा केले आणि त्यांच्या घरी पोहोचलो. घराचा दरवाजा तिथे काम करणाऱ्या एका महिलेने उघडला. काही क्षण मी त्यांचे घरच पाहात होतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका सुंदर बंगला पाहिला होता. घरात गेल्यावर माझे डोळे केवळ राजेश खन्ना यांना शोधत होते. पण त्यांना पाहाण्याची संधी मला त्यावेळी मिळाली नाही. कारण ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांना भेटायला मिळाले नसल्याने मी प्रचंड दुःखी झालो होतो. 

इरफान यांनी पुढे सांगितले होते की, राजेश खन्ना यांना मिळालेले स्टारडम कोणत्याच कलाकाराला कधीच मिळाले नाही. त्यांना मला त्या दिवशी भेटायला मिळाले नाही. पण काही वर्षांनी मी त्यांना भेटलो होतो. मात्र त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले नाही. 

Web Title: When Irrfan went to Rajesh Khanna's home to fix his AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.