केवळ या एका गोष्टीमुळे जया बच्चन यांनी यामुळे करिश्मा कपूर ऐवजी ऐश्वर्या रायची केली सून म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 02:21 PM2020-03-30T14:21:00+5:302020-03-30T14:30:53+5:30
जया बच्चन यांनीच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या संसारात प्रचंड खुश असून त्यांना आराध्या ही गोंडस मुलगी देखील आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अभिषेकचा साखरपुडा करिश्मा कपूरसोबत झाला होता. बच्चन कुटुंबियांसोबत ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असे. त्यामुळे आता अभिषेक आणि तिचे लवकरच लग्न होईल असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांचा साखरपुडा मोडला. काही वर्षांनंतर तिने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आज करिश्मा एकटीच तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.
करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत.
करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ही मुलाखत २००८ मध्ये छापून आली होती.
जया बच्चन यांनी या मुलाखतीत त्यांच्या कुटूंबाची मूल्ये, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कशाप्रकारे संस्कार दिले याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. तसेच या मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत.
जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते. त्यानंतर काही सेकंदानंतर त्या म्हणाल्या होत्या की, करिश्मा ही कपूर कुटुंबातील आहे. कपूर कुटुंबातील सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार आहेत. तिचे वडील आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबत देखील खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये असे मला वाटते.