Jaya Bachchan Birthday: अमिताभ रोमॅन्टिक आहेत का...? जेव्हा जया बच्चन यांनी दिलं होतं हैराण करणारं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 11:52 AM2023-04-09T11:52:18+5:302023-04-09T11:53:11+5:30
Jaya Bachchan, Amitabh Bachchan : जया बच्चन आताश: चित्रपटांपेक्षा राजकारणामुळे चर्चेत असतात. पण एकेकाळी जयांच्या पर्सनल लाईफचीही जोरदार चर्चा होती.
Jaya Bachchan Birthday: जया बच्चन आताश: चित्रपटांपेक्षा राजकारणामुळे चर्चेत असतात. पण एकेकाळी जयांच्या पर्सनल लाईफचीही जोरदार चर्चा होती. रेखा व अमिताभ बच्चन यांच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे त्यांचं वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झालं होतं. पण जया बच्चन ना स्वत: खचल्या ना त्यांनी आपलं संसार विस्कटू दिला. जया व अमिताभ एक नजर या सिनेमाच्या सेटवर प्रेमात पडले होते यानंतर १९७३ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण ज्या व्यक्तिसोबत त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेता, ती व्यक्ती कधीच रोमॅन्टिक नव्हती. होय, सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये खुद्द जया यांनी हा खुलासा केला होता.
जया व अमिताभ जोडीने सिमी ग्रेवाल यांच्या Rendezvous with Simi Garewal शोमध्ये आले होते. या शोमध्ये सिमी यांनी जया व अमिताभ यांना खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. पती म्हणून तुम्ही अमिताभ यांना किती गुण द्याल? काय अमिताभ रोमॅन्टिक आहेत? असा प्रश्न सिमीने जया यांना केला होता.
यावर, 'मेरे साथ नहीं....', असं उत्तर जया यांनी दिलं होतं. अमिताभ रोमॅन्टिक आहेत, असं मला तरी वाटत नाही. कमीत कमी माझ्यासोबत तर नाहीत. कदाचित गर्लफ्रेन्ड असती तर फुलं व वाईन आणण्यासारख्या रोमॅन्टिक गोष्टी त्यांनी केल्या असत्या. मला कधीच ते रोमॅन्टिक वाटले नाहीत, असं पुढे त्या म्हणाल्या होत्या.
तुम्ही गर्लफ्रेन्ड होत्या, तेव्हा तरी अमिताभ रोमॅन्टिक होते का? असं विचारलं असता जयांनी आणखीच हैराण करणारं उत्तर दिलं होतं. मी व अमिताभ आम्ही डेट करत असताना एकमेकांशी बोलत नव्हतो, असं त्या म्हणाल्या होत्या. सिमी यांनी यावर प्रश्नार्थक नजरेने बघितल्यावर, म्हणजे त्यावेळी मोठ्या मुश्किलीने आमचं बोलणं व्हायचं, असं म्हणत त्यांनी सारवासारव केली होती.