'शाहरूख खान ओव्हर एक्टिंग करतो, मी त्याचा फॅन नाही' करण जोहरचे स्टेटमेंट होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 06:20 PM2020-11-10T18:20:34+5:302020-11-10T18:44:07+5:30

"शाहरुख खान मला आवडत नाही. कारण मला वाटते की तो ओव्हर एक्टिंग करतो. 

When karan johar says i was not shah rukh khans fan at all | 'शाहरूख खान ओव्हर एक्टिंग करतो, मी त्याचा फॅन नाही' करण जोहरचे स्टेटमेंट होतंय व्हायरल

'शाहरूख खान ओव्हर एक्टिंग करतो, मी त्याचा फॅन नाही' करण जोहरचे स्टेटमेंट होतंय व्हायरल

googlenewsNext

चित्रपट निर्माते करण जोहरचे जुने स्टेंटमेंट मीडियामध्ये व्हायरल होते आहे, त्यात करण म्हणाला की "शाहरुख खान मला आवडत नाही. कारण मला वाटते की तो ओव्हर  एक्टिंग करतो.  करण जोहरचे वक्तव्य 'अ‍ॅन अनसेटेबल बॉय' या ऑटोबायोग्राफी मधले आहे, जी त्यांने  पूनम सक्सेनाबरोबर लिहिलेली आहे.

 'मी त्याचा फॅन नव्हतो'
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार करणने पुस्तकात लिहिले आहे, "शाहरुख १९९१ साली आला होता आणि मी त्यांचा अजिबात चाहता नव्हतो. मजेची गोष्ट म्हणजे तो मला सर्वात कमी आवडला होता. परंतु, तो अपूर्व मेहताला(करणचा मित्र आणि आता धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ) आवडत होता.". मी आमिरच्या टीममध्ये होतो आणि तो शाहरुखच्या टीममध्ये होते. एकीकडे मुली होत्या, ज्यांना शाहरुखचं वेड लागलं होतं आणि दुसरीकडे  मी आमिरसाठी वेडा होतो."

 

 मला 'दिवाना' चित्रपट आवडला नाही
करण म्हणाला, "मी शाहरुख खानचा फॅन नव्हतो, कारण मला वाटतं की तो ओव्हर  एक्टिंग करतो. मला त्याचा 'दीवाना' (शाहरुखचा पहिला चित्रपट) आवडला नव्हता आणि अपूर्व म्हणायचा की, आमिर खूप बोरिंग आहे. त्याच्याबद्दल तुला एवढे काय वाटते? मग आम्ही आमिर आणि शाहरुखवर ह्याच्यावरून भांडायचो असे भांडायचो "

 'करण- अर्जुन' च्या सेटवर झाली पहिली मीटिंग
करण जोहरच्या म्हणण्यानुसार, करण आणि अर्जुनच्या सेटवर त्याची आणि शाहरुखची पहिली भेट झाली.  त्याने आपल्या पुस्तकात असे लिहिले आहे की, त्याच्या वडिलांना म्हणजेच यश जोहर यांना'डुप्लिकेट' चित्रपटात शाहरुखला साइन करायचे होते.

 जेव्हा ते 'करण-अर्जुन' च्या सेटवर शाहरुखला भेटायला गेले होते, तेव्हा ते करणला बरोबर घेऊन गेले होते. करणच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी खूप नर्व्हस झाला होता मग त्याने काजोलला विचारले की ती सुद्धा सेटवर आहे का?

 करण लिहितो "मला वाटायचं की शाहरुख फार गर्विष्ठ असेल, परंतु ५ मिनिटांच्या भेटीनंतरच माझा त्याच्याबाबत दृष्टीकोन बदलला."  करणने लिहिले की शाहरुखने त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता आणि तो म्हणाला- “नाही-नाही, मला इंटरेस्ट नाही”.

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले
 करण जोहरने १९९८ मध्ये शाहरुख खानला घेऊन 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. याशिवाय शाहरुखने करणच्या दिग्दर्शनाखाली 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना', 'माय नेम इज खान' आणि 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये काम केले आहे.

 शाहरुख आणि करणने पहिल्यांदा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मध्ये एकत्र काम केले होते, हा दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्राचा पहिला चित्रपट होता.  या सिनेमात करणने शाहरुखचा मित्र रॉकीची भूमिका केली होती.
 

Web Title: When karan johar says i was not shah rukh khans fan at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.