दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 15:11 IST2020-09-25T15:10:53+5:302020-09-25T15:11:31+5:30
करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोघांचा बाप आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे.

दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह इटलीत रेशीमगाठीत अडकल्यानंतर. ५ दिवसांनी ‘दीपवीर’ने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केले होते. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. ‘दीपवीर’चे फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला होता. मात्र या सा-यांमध्ये हटके शुभेच्छा देत बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या एका कमेंटने सा-यांचे लक्ष वेधले होते. या फोटोवर दिलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली होती.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहून रणवीरचा मूड बदलला की काय अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या.'' उफ्फ, मलाही आता लग्न करायचे आहे''. अशी कमेंट करणने दीपवीरच्या एका फोटोला दिली होती. आजवर करणने लग्न करणारच नाही असं बऱ्याचदा म्हटलं होतं. मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने करणचे फॅन्स खूश झाले होते. करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोघांचा बाप आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे.
करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीसंदर्भात एनसीबीत तक्रार
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी गेल्यावर्षी झालेली बॉलिवूड गँगची एक पार्टी चांगलीच वादात सापडली होती. या कथित ‘ड्रग्ज’ पार्टीला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. करणच्या घरी झालेल्या या लेट नाईट पार्टीची ड्रग्ज अँगलने चौकशी करण्याची मागणी करत शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली आहे.
मनजिंदर सिंग सिरसा यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘मी आज राकेश अस्थाना यांना नारकोटिक्स ब्युरो बीएसएफच्या दिल्ली येथील मुख्यालयी भेटलो. मी त्यांच्याकडे निर्माता करण जोहरविरोधात तक्रार दाखल केली. मुंबईत करण जोहरच्या घरी झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या व्हिडीओची चौकशी व्हावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली,’ असे ट्विट सिरसा यांनी केले आहे.