ह्रतिकसोबत होती अफेअरची चर्चा, करिना म्हणाली- विवाहित पुरुषाच्या नाही पडणार प्रेमात कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:58 PM2020-12-10T13:58:22+5:302020-12-10T14:15:42+5:30
ह्रतिक आणि करिनाच्या ‘सीक्रेट अफेयर’ च्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.
सैफ अली खानसोबत करिना कपूर सुखी आयुष्य जगत आहे. मात्र, तिच्या लग्नाआधीही अनेक को-स्टार्सशी लिंकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. करिअरच्या सुरुवातीलाच करिनाचे नाव हृतिक रोशनशीही जोडले गेले होते. या दोघांनी 'कभी खुशी कभी गम' आणि 'यादें' सिनेमामध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांच्या ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होते. यासंदर्भात करिनाने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
हृतिकच्या कुटुंबियांनी केला होता हस्तक्षेप
त्यावेळी हृतिकने सुझानसोबत लग्न केले होते, त्याच्या आणि करिनाच्या ‘सीक्रेट अफेयर’ च्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. अशी बातमीही आली होती की करिना हृतिकसाठी आपले करियर सोडण्यास तयार आहे. या प्रकरणात हृतिकच्या कुटूंबाला हस्तक्षेप करावा लागला आणि करिनाला हृतिकपासून दूर राहण्यास सांगण्यात आले, अशीही चर्चा होती.
ह्रतिकच्या लग्नाची होती जास्त काळजी
२००२ मध्ये फिल्मफेअरला करिनाने एक मुलाखत दिली होती ज्यात तिने हृतिकशी लिंकअपच्या बातमीवर भाष्य केले होते. करिना म्हणाली होती, मला सर्वात जास्त काळजी होती की त्याच्या लग्नावर परिणाम होईल. माझ्यासाठी ही प्रोफेशन लाईफमध्ये अडचणीची बाब होती. हृतिकबरोबर पूर्वी जोडलेले नाव उद्या कोणा दुसर्याबरोबर जोडले जाईल. जोपर्यंत मला सत्य माहित आहे, मी ठीक आहे.
या मुलाखतीत करिनाने सांगितले होते की, माझ्या आणि हृतिक दरम्यानच्या लिंकअपच्या बातम्यांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मी त्याच्यासाठी माझे करिअर सोडायला तयार झाले.मी कोणत्याही व्यक्तीसाठी हे कधीही करू शकत नाही. जर माझ्या पार्टनरने मला कधीही आपले करिअर सोडण्यास सांगितले तर मी त्याला माझ्या आयुष्यातून रफा दफा करेन.
.
करिनाला एका मागोमाग एका मुलाखतीत हृतिकबद्दल विचारले गेले तेव्हा कंटाळून ती म्हणाली होती की, कृपया मला सोडून द्या. मी कोणत्याही विवाहित व्यक्तीच्या प्रेमात नाही आणि मी कधी अफेअरसुद्धा करणार नाही. विवाहित पुरुष माझे करिअर उध्वस्त करेल.