Lata Mangeshkar : जेव्हा लता मंगेशकर यांनी सर्वांसमोर मोहम्मद रफींसोबत गाण्यास दिला होता नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:34 PM2022-02-06T12:34:51+5:302022-02-06T14:01:13+5:30

When Mohammed Rafi refused to sing with Lata Mangeshkar: एकत्र अनेक सुपरहिट गाणी दिलेल्या या जोडीने जवळपास ४ वर्ष एकमेकांसोबत बोलणं बंद केलं होतं.

When Lata Mangeshkar refused to sing with Mohammed Rafi in front of everyone | Lata Mangeshkar : जेव्हा लता मंगेशकर यांनी सर्वांसमोर मोहम्मद रफींसोबत गाण्यास दिला होता नकार, कारण...

Lata Mangeshkar : जेव्हा लता मंगेशकर यांनी सर्वांसमोर मोहम्मद रफींसोबत गाण्यास दिला होता नकार, कारण...

googlenewsNext

When Mohammed Rafi refused to sing with Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं नुकतंच दु:खद निधन झालं. ज्यामुळे देशभरातील लोकांवर शोककळा पसरली आहे. देशभरातील लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. सोशल मीडियावरून त्यांचीविषयी, त्यांच्या जुन्या किस्स्यांविषयी चर्चा केली जात आहे. असाच एक किस्सा लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांचा होता. एकत्र अनेक सुपरहिट गाणी दिलेल्या या जोडीने जवळपास ४ वर्ष एकमेकांसोबत बोलणं बंद केलं होतं.

६० च्या दशकात रफी साहेब आणि लता मंगेशकर यांच्यातील एक वाद चांगलाच चर्चेत आला होता. भलेही दोघांच्या जोडीने गायलेल्या गाण्यांचं कौतुक झालं होतं. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, दोघांनी ४ वर्ष एकमेकांशी एक शब्द बोलला नव्हता. अखेर असं काय झालं होतं की, लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणी गाण्यास नकार दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यात वाद झाला होता गाण्यांमधून मिळणाऱ्या रॉयल्टीबाबत. लता दीदी यांचं मत होतं की, संगीतकारांसारखं गायकांनाही गाण्याची रॉयल्टी मिळायला हवी. पण रफी साहेबांचं यावरील मत लता मंगेशकर यांच्या मताच्या विरूद्ध होतं. रफी साहेबांचं मत होतं की, गायकाला एका गाण्यासाठी मानधन मिळतं, मग रॉयल्टीवर त्याचा काही अधिकार राहत नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, १९६१ मध्ये 'माया' सिनेमाच्या रेकॉर्डिंग दरम्यान लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यातील हे मतभेद समोर आले होते. रेकॉर्डिंगनंतर जेव्हा लता मंगेशकर यांनी रफी साहेबांना रॉयल्टीबाबत त्यांचं मत विचारलं तर त्यांनी यावर नकार दिला. तेव्हा लता दीदी यांनी त्याच स्टुडिओत घोषणा केली की, यापुढे त्या मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणं गाणार नाहीत. हे म्हणत त्या तिथून निघून गेल्या होत्या. असं म्हणतात की, ४ वर्षानंतर अभिनेत्री नर्गिसच्या प्रयत्नांनंतर दोघांमधील मतभेद दूर करण्यात आले होते.
 

Web Title: When Lata Mangeshkar refused to sing with Mohammed Rafi in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.