नर्गिस यांना संजय दत्त गे असल्याची वाटली होती भीती, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 18:00 IST2020-04-16T17:59:37+5:302020-04-16T18:00:48+5:30
संजय दत्त गे असल्याची भीती त्याच्या आईला म्हणजेज नर्गिस दत्त यांना वाटत होती. एका पुस्तकामध्येच याचा उल्लेख करण्यात आला आहे.

नर्गिस यांना संजय दत्त गे असल्याची वाटली होती भीती, हे होते कारण
बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तच्या जीवनातील चढउतार 2018 साली रिलीज झालेल्या बायोपिकमध्ये पहायला मिळाले. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. रणबीरच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. यासोबतच संजय दत्तच्या आयुष्याबद्दल न माहीत असलेले खुलासेदेखील या चित्रपटात पहायला मिळाले. संजय दत्त गे असल्याची भीती त्याच्या आईला म्हणजेज नर्गिस दत्त यांना वाटत होती. एका पुस्तकामध्येच याचा उल्लेख करण्यात आला आहे.
संजय दत्तच्या संजय दत्तः द क्रेझी अन्टोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूडज बॅड बॉय हे पुस्तक यास्सीर उस्मान यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात संजयची बहीण नम्रताने सांगितले आहे की, माझी आई संजयवर अनेकवेळा चिडायची, त्याला सुवर, उल्लू, गाढव सगळे काही बोलायची. एवढेच नव्हे तर त्याच्यावर चप्पल फेकून देखील मारायची. पण अखेरीस त्याच्या मागण्या पूर्ण करायची. संजय २२ वर्षांचा होता, त्यावेळी माझ्या आईचे निधन झाले. त्यावेळी त्याचा रॉकी हा चित्रपट देखील आला नव्हता. त्याकाळात तो ड्रग्स घेत होता. पण तो ड्रग्सच्या अधीन गेलेला नव्हता. मात्र आईच्या निधनानंतर तो ड्रग्सच्या अधीन गेला. आई असताना तिला संजय ड्रग्स घेतोय याचा पुरावा देऊन देखील ती ही गोष्ट मान्य करायची नाही. उलट काही वेळा तीच त्याला वाचवायची. माझ्या आईचा संजयवर प्रचंड विश्वास होता. माझा मुलगा दारू पिऊ शकतो. पण ड्रग्स घेणार नाही असे तिचे ठाम मत होते.
या पुस्तकात प्रिया दत्तने सांगितले आहे की, मी एकदा आईला एका मैत्रिणीला सांगताना ऐकले होते की, संजयचे फ्रेंड त्याच्या घरी आल्यानंतर तो नेहमीच त्याच्या रूमचा दरवाजा बंद करतो. मी आशा करते की, तो गे नसावा...