महेश भट्ट यांच्या प्रेमात आकंत बुडाली होती 'ही' अभिनेत्री, कपडे न घालताच धावली होती त्यांच्या मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:27 PM2020-06-24T13:27:08+5:302020-06-24T13:27:38+5:30
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी होत्या त्याच अवस्थेत त्यांच्या मागे धावल्या होत्या. तेव्हा अशा परिस्थितीतही परवीन बाबी रस्त्यावर त्यांच्या पाठी धावत असल्याचे पाहून महेश भट्ट यांची चिंता वाढली होती.
20 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी यांचे निधन झाले. 22 जानेवारीला महेश भट्ट यांना त्यांच्या मृत्यूची बातमी समजली होती. महेश भट्ट आजही त्यांच्या यशाचे श्रेय परवीनला देतात. महेश भट्ट यांचा ‘अर्थ’ हा सिनेमा परवीनबरोबरच्या त्याच्या नात्यावरच आधारित आहे. अनेकदा दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी परवीन बाबीबद्दल वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
परवीन बाबी तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती. म्हणून खुद्द महेश भट्ट सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ युजी कृष्णमूर्ती यांना भेटले. तेव्हा त्यांना कळाले की, परवीन बाबी पॅराऑनॉइड स्किझोफ्रेनिया आजाराशी पिडीत आहे.या आजारात मनात भीती आणि संभ्रम निर्माणे होतो. उपचारासाठी परवीनची ओळख यूजी कृष्णमूर्तीशी करून दिली.युजी यांनी परवीनची तब्येत बघता तिला सिनेमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. ही गोष्ट परवीनला अजिबात आवडली नाही. तेव्हापासून युजी तिला खटकू लागले.
महेश भट्ट एका रात्री परवीन बाबी यांच्याबरोबर बेडरूममध्ये होते. तेव्हा परवीनने युजीसह मैत्री ठेवली तर मला कींवा युजी दोघांपैकी एकालाच निवडावे लागेल असे सांगितले. महेश भट्ट यांनी असे ऐकताच या गोष्टीला नकार दिला. त्यांना परवीनने जे काही सांगितले ते अजिबात आवडले नाही. आणि रागाच्या भरात तडकाफडकी तेथून निघून गेले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी होत्या त्याच अवस्थेत त्यांच्या मागे धावल्या होत्या. तेव्हा अशा परिस्थितीतही परवीन बाबी रस्त्यावर त्यांच्या पाठी धावत असल्याचे पाहून महेश भट्ट यांची चिंता वाढली होती.