'तो खूप अशिक्षित आहे'; राजकुमारने दिला होता नाना पाटेकरांसोबत काम करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 02:11 PM2023-06-18T14:11:54+5:302023-06-18T14:14:15+5:30
Nana Patekar: इतरांना कायम स्पष्टपणे तोंडावर बोलणारे राजकुमार चक्क नानांसोबत काम करण्यास टाळत होते.
आपल्या दर्जेदार अभिनयातून कायम प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). कधी गंभीर तर, कधी विनोदी अशा कितीतरी भूमिका साकारुन नाना पाटेकरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच मराठीसह बॉलिवूडमध्येही त्यांनी त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नाना पाटेकरांनी आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, राजकुमार यांनी नानांसोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार त्यांच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि गर्विष्ठ स्वभावामुळेही ओळखले जायचे. त्यामुळे बऱ्याचदा न पटणाऱ्या गोष्टी ते लोकांच्या तोंडावर स्पष्टपणे बोलून मोकळे व्हायचे. म्हणूनच, त्यांच्यासोबत काम करायला अनेक कलाकार नकार द्यायचे. परंतु, इतरांचा कायम पाणउतारा करणारे राजकुमार चक्क नानांसोबत काम करण्यास टाळत होते.
'ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि...'; वडिलांच्या उपचारासाठी नाना पाटेकरांकडे नव्हते पैसे
प्रथम नानांनी दिला सिनेमा करण्यास नकार
मेहुल कुमार यांचा तिरंगा हा सिनेमा साऱ्यांनाच ठावूक आहे. हा सिनेमा त्याकाळी चांगलाच गाजला होता. या सिनेमात राजकुमार आणि नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या सिनेमासाठी मेहुल कुमार यांनी आधीच राजकुमारला साईन केलं होतं. त्यानंतर ते दुसऱ्या भूमिकेच्या शोधात होते. या भूमिकेसाठी त्यांनी नानांची निवड केली. मात्र, या सिनेमा राज कुमार असल्यामुळे नानांनी थेट नकार दिला. नानांचा नकार येताच मेहुल यांनी त्यांची समजूत घातली. त्यांनी, जर राजकुमार मला काही बोलला तर मी हा सिनेमा अर्धवट सोडून निघून जाईन, अशी अट नानांनी घातली आणि ते चित्रपट करायला तयार झाले.
राज कुमार यांनी नानांसोबत काम करण्यास दिला नकार
आपल्यासोबत नाना पाटेकर स्क्रीन शेअर करणार आहे ज्यावेळी राज कुमार यांना कळलं त्यावेळी त्यांनी थेट सिनेमा करण्यास नकार दिला, 'तू नानाला चित्रपटात का घेतलंस, तो खूप अशिक्षित आहे. तुला दुसरं कोणी मिळालं नाही का?' त्यानंतर मेहुलने त्यांना नानांची अट सांगितली.
दरम्यान, दोन्ही कलाकारांनी प्रथम नकार दिला. मात्र, सिनेमाच्या टीमने मध्यस्थी केल्यामुळे नंतर या दोघांनी सिनेमात काम करण्यास होकार दिला. तसंच सिनेमाचं संपूर्ण शुटिंग होईपर्यंत राजकुमार यांनी नाना पाटेकरांसोबत अंतर राखलं होतं.