Rani Mukerji : राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई का बनू शकली नाही? खुद्द अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:43 PM2023-03-23T13:43:31+5:302023-03-23T13:43:41+5:30
Rani Mukerji : आपलं कौटुंबिक आयुष्य राणीने कधीच लाईमलाईटमध्ये येऊ दिलं नाही. मात्र पहिल्यांदाच राणी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली. एका मुलाखतीत तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल भाष्य केलं.
राणी मुखर्जी (Rani Mukerji ) ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. १९९६ साली Biyer Phool या बंगाली सिनेमातून राणीने ॲक्टिंगमध्ये डेब्यू केला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारी राणी आताश: फारच निवडक सिनेमात दिसते. पण म्हणून तिची क्रेझ कमी झालेली नाही. नुकताच तिचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस मिस नॉर्वे' हा सिनेमा रिलीज झालाये. या सिनेमातील राणीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतंय. याच चित्रपटाच्या निमित्ताने राणीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
२०१४ मध्ये राणीने आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली. डिसेंबर २०१५ मध्ये राणीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. तिची लेक आदिरा आता नऊ ते दहा वर्षांची झालीये. राणीने आदिराला मीडियापासून दूर ठेवलं. आपलं कौटुंबिक आयुष्यही तिने लाईमलाईटमध्ये येऊ दिलं नाही. मात्र पहिल्यांदाच राणी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली. एका मुलाखतीत तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल भाष्य केलं.
मला खरं तर दोन मुलांची आई व्हायचं होतं. आदिराच्या जन्मानंतर मला आणखी एका अपत्याची इच्छा होती. पण माझं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. आदिराच्या जन्मानंतर आम्ही लगेच दुसऱ्या प्रेग्नेंसीचं प्लॅनिंग करायला हवं होती. मात्र आता उशीर झाला आहे. वय निघून गेलं आहे, असं राणी या मुलाखतीत म्हणाली.
राणी आणि आदित्य चोप्रा यांनी अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केलं होतं. परंतु त्यांची पहिली भेट ही एका रेस्टाॅरंटमध्ये झाली होती. तेव्हा राणी या इंडस्ट्रीमध्ये अगदीच नवखी होती. आदित्यचा स्वभाव अतिशय लाजाळू असल्याने तो प्रसिद्धी माध्यमांपासून कायम दूर असतो. मात्र राणीला त्याचा हाच स्वभाव सर्वाधिक आवडतो. माझ्यासाठी आदित्य हा शंकर आहे. बंगालीमध्ये एक म्हण आहे शक्तीला शांत ठेवण्यासाठी शिवाची गरज असते. तसेच आदित्य माझ्या आयुष्यातील शिव आहे. त्याच्या स्वभावही शांत आणि गंभीर आहे. त्यामुळेच आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, असं ती म्हणाली होती.