अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 15:19 IST2019-02-10T15:18:42+5:302019-02-10T15:19:35+5:30
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, याच रणवीरने एकेकाळी निराश होत अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका शोमध्ये रणवीरने याचा खुलासा केला.

अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!!
रणवीर सिंग बॉलिवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकणारा रणवीर आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, याच रणवीरने एकेकाळी निराश होत अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका शोमध्ये रणवीरने याचा खुलासा केला.
माझी चित्रपटसृष्टीत कुणासोबतचं ओळख नव्हती. तो माझा संघर्षाचा काळ होता. मी १० वीत होतो. इंडस्ट्रीत कुठलीच ओळख नसताना माझा टिकाव लागणे अशक्य आहे, या विचाराने मी निराश झालो होतो. एकक्षण अभिनय वगैरे सोडून आपल्या अवाक्यातील काहीतरी करायचे, असे मी ठरवले आणि युनिव्हर्सिटी आॅफ अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथले रजिस्ट्रेशन बंद झाले होते. केवळ अॅक्टिंग क्लासमध्ये जागा शिल्लक होत्या. अखेर मी या क्लासला अॅडमिशन घेतले. क्लासमध्ये पहिल्याच दिवशी मला परफॉर्म करायला सांगितले गेले. माझा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. त्याक्षणी माझा गमावलेला आत्मविश्वास मी परत मिळवला. मी एक चांगला कलाकार आहे, यावर माझा विश्वास बसला आणि पुढे अभिनयातचं करिअर करायचे हा माझा इरादा पक्का झाला, असे रणवीरने सांगितले.
२०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतरख्या ८-९ वर्षांत रणवीरने स्वत:ला सिद्ध केले आणि एकापेक्षा एक सरस भूमिका वठवत, बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.
अलीकडे आलेला रणवीरचा ‘सिम्बा’ ब्लॉकबस्टर ठरला. लवकरच रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यानंतर ‘८३’ या चित्रपटात तो दिसणार आहे.रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या १४ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.