THROWBACK :रवीना टंडनने 'या' मुलाला सेटवरुन हाकलून दिले होते, आज तोच बॉलिवूडवर करतोय राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:32 PM2022-02-04T13:32:55+5:302022-02-04T13:47:28+5:30
THROWBACK : त्यावेळी रवीना टंडन अक्षय कुमारसोबत 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यांचं शूटिंग करत होती.
रवीना टंडन(Raveena Tandon)ने मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. या गाण्यात ती पिवळी साडीत हॉट दिसत होती. रवीना टंडनने 'तू चीज बडी है मस्त मस्त' आणि 'अंखियों से गोली मारे' यांसारख्या गाण्यांमध्ये तिच्या अभिनयाने लोकांना वेडं लावलं होतं.
रवीना आजही तितकीच सुंदर दिसते जितकी ती पूर्वी दिसायची. ती आजही अनेकांच्या मनावर राज्य करते. पण तुम्हाला माहीत आहे का की, एकेकाळी या अभिनेत्रीने आजच्या सर्वात मोठ्या स्टारला सेटवरून हाकलून दिले होते. रवीना टंडन आणि रणवीर सिंग यांच्याशी संबंधित एक गोष्ट सांगणार आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
लहानपणापासूनच रणवीर सिंग अक्षय कुमारचा खूप मोठा चाहता होता. रणवीरचे वडील इंडस्ट्रीतील काही निर्मात्यांना चांगलेच ओळखत होते. जेव्हा रणवीरचे चुलत भाऊ कॅनडातून आले तेव्हा त्याने हट्ट धरला, त्यानंतर रणवीरचे वडील त्याला 'मोहरा' चित्रपटाच्या सेटवर घेऊन गेले. तिथे रवीना टंडन अक्षय कुमारसोबत 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यांचं शूटिंग करत होती. त्यावेळी रणवीर केवळ 11 वर्षांचा होता. रणवीरला सेटवर पाहून रवीनाला काहीसे अवघडल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे तिने लगेच निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून बाहेर काढले.
रवीनाने असे का केले, याचा खुलासाही नंतर झाला होता. रवीनाने स्वत: याबद्दल सांगितले होते. होय, मी रणवीरला सेटवरून हाकलले होते. कारण त्यावेळी ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्याचे शूटींग सुरु होते आणि हे गाणे प्रचंड सेन्शुअल होते. रणवीर तेव्हा खूप लहान होता. मुलांनी असे सेन्शुअल गाणे शूट होताना पाहू नये, असे माझे मत होते. त्यामुळे आईवडिलांना राहू द्या पण लहान मुलांना बाहेर काढा, असे मी निर्मात्यांना सांगितले होते. मुलांनी वयाच्या हिशेबाने योग्य तेच पहावे, हे माझे मत आहे आणि आत्ताही मी या मतावर ठाम आहे, असे रवीना म्हणाली होती.
मोहरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील गाण्याने 'तू चीज बडी है मस्त मस्त' अभिनेत्री रवीनाला रातोरात स्टार बनवले. बॉलीवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा फक्त रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेअरचीच चर्चा होती.