या कारणामुळे ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांना घालावा लागला होता बुरखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:09 PM2018-09-07T16:09:22+5:302018-09-07T16:10:45+5:30
माधुरी दीक्षितने ऋषी कपूर यांना ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर ऋषी आभार यांनी माधुरीचे आभार तर मानले. पण त्यासोबतच या दोघांच्या आयुष्यात घडलेला एक रंजक किस्सा ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितला.
ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी याराना या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी या चित्रपटातील मेरा पिया घर आया है गाणे चांगलेच गाजले होते. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण हैद्राबाद येथे झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक भन्नाट किस्सा ऋषी कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच त्यांच्या फॅन्सना सांगितला आहे.
ऋषी कपूर यांचा काहीच दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. त्यांच्या बॉलिवूडमधील अनेक सहकलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. माधुरी दीक्षितने देखील ऋषी कपूर यांना ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर ऋषी आभार यांनी माधुरीचे आभार तर मानले. पण त्यासोबतच या दोघांच्या आयुष्यात घडलेला एक रंजक किस्सा ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितला. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, आपण दोघांनीही बुरखा घालून प्रवास केला होता ही गोष्ट आजही माझ्या चांगलीच लक्षात आहे. आपण याराना या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादला गेलो होतो. कोणीही आपल्याला दोघांना ओळखू नये यासाठी आपण बुरखा घातला होता. पण पुणे स्टेशन जवळ असतानाच माझा बुरखा सरकला आणि काही लोकांनी मला ओळखले. त्यानंतर आपला जो भयंकर प्रवास होता तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर प्रवास करणे हे आपल्या दोघांसाठी खूपच कठीण झाले होते.
या ट्वीटवर माधुरीने देखील लगेचच उत्तर दिले आहे. तिने लिहिले आहे की, तो खरंखरच भयानक दिवस होता. आपण त्या दिवशी खूपच धाडसी प्रयोग केले होते असेच मी म्हणेन. त्या दिवसाची आठवण आली तरी माझे हसू आवरत नाही. त्या चांगल्या दिवसांसाठी चिअर्स...
माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांनी याराना प्रमाणेच प्रेमग्रंथ, साहिबा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.