Saif Ali Khan: “स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न करा...”, जेव्हा सैफ अली खाननं पुरुषांना दिलेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 05:23 PM2023-03-10T17:23:15+5:302023-03-10T17:24:12+5:30

Saif Ali Khan: होय, करिनाशी (Kareena Kapoor) लग्न केल्यानंतर सैफनं लग्न करू इच्छिणाऱ्या पुरूषांना एक सल्ला दिला होता. काय होता तो सल्ला?

when saif ali khan advised all men to marry younger beautiful women after marrying kareena kapoor | Saif Ali Khan: “स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न करा...”, जेव्हा सैफ अली खाननं पुरुषांना दिलेला सल्ला

Saif Ali Khan: “स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न करा...”, जेव्हा सैफ अली खाननं पुरुषांना दिलेला सल्ला

googlenewsNext

Saif Ali Khan: सैफ अली खाननं (Saif Ali Khan)  दोन लग्न केलीत. पहिलं लग्न केलं ते स्वत:पेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगसोबत. पण काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर दुसरं लग्न केलं ते स्वत:पेक्षा १० वर्षांनी लहान करिना कपूरसोबत. सैफिनाच्या लग्नाला जवळपास ११ वर्षे झाली आहेत. दोघंही सुखात नांदत आहेत.  २०१२ मध्ये सैफनं करिनासोबत लग्न केलं. हे आठवायचं कारण म्हणजे सैफची एक जुनी मुलाखत. होय, करिनाशी (Kareena Kapoor) लग्न केल्यानंतर जवळपास २ वर्षांनी सैफनं एक मुलाखत दिली होती. सध्या त्याचीच चर्चा आहे. या मुलाखतीत सैफनं लग्न करू इच्छिणाऱ्या पुरूषांना एक सल्ला दिला होता. काय होता तो सल्ला?

या मुलाखतीत सैफ आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल भरभरून बोलला होता. करिना कपूरसोबत लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात योग्य निर्णय आहे, असं तो म्हणाला होता. शिवाय याच मुलाखतीत आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणं गरजेचं का आहे,यावरही तो बोलला होता.
 करिनासोबत लग्न करणं हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे असं वाटतं का?, असा प्रश्न फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत त्याला विचारला गेला होता. यावर तो म्हणाला होता ''हो अगदी योग्य निर्णय आहे..यात काहीच डाऊट नाही.  हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे, असं मी म्हणू शकतो.''

 वयातील अंतर नात्यावर परिणाम करतं का? असं विचारल्यावर त्याने पुरूषांना एक सल्ला दिला होता. ''मी सगळ्याच पुरुषांना सल्ला देईन की आपल्यापेक्षा खूप छोट्या आणि सुंदर महिलेशी लग्न करा'', असं तो म्हणाला होता. याागचं कारणही त्याने सांगितलं होतं. ''पुरुष थोडं उशिराने मॅच्युअर्ड होतात आणि महिला खूप लवकर मोठ्या दिसू लागतात. जणू त्यांचं वय झपाट्याने वाढतेय असं वाटतं,'' असं कारण त्याने दिलं होतं.  सैफ अली खानचा जन्म १९७० साली झाला तर करिना कपूरचा जन्म १९८० साली झाला. दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे.   

Web Title: when saif ali khan advised all men to marry younger beautiful women after marrying kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.