एक टक बघत राहिला सैफ अली खान, फोटो पाहून चाहत्यांनीही केला होता शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 12:26 PM2020-11-24T12:26:12+5:302020-11-24T12:26:41+5:30
दुस-यांदा बाळाला जन्म देणार असल्यामुळे करिना सध्या खूश आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे. दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुढील वर्षाच्या सुरूवातीला सैफीनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तैमूरदेखील आपल्या भाऊ किंवा बहिणीची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तैमूरचा छोट्या पाहुण्यासोबत खेळतानाचा फोटो समोर आला होता. तैमूरच्या मांडीवर बेबी गर्ल पहायला मिळत आहे. तर तैमूर खूप मोठी स्माइल देताना दिसतो आहे. दुस-यांदा बाळाला जन्म देणार असल्यामुळे करिना सध्या खूश आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे. दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ आहे. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने एका गोंडस मुलीला जन्म देण्याची तिची ईच्छा असल्याचे सांगितले होते. मुलगी नाही पण तिने मुलाला जन्म दिला त्याचे नाव आहे तैमुर.
करिनाचे बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. प्रेग्नंसीमुळे तिच्या चेह-यावरही कमालीचा ग्लो आल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान आणखीन एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सैफच्या हातात एक बाळ दिसतंय. थोडा वेळ हा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडतातयेत. सैफच्या हातातील बाळ बेबी तैमुर आहे. तैमुरच्या जन्मावेळी सैफने तैमुरसह क्लिक केलेला हा फोटो आहे.
बी टाऊनमध्ये तैमूर अली खानची जास्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळतात. त्याच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत तैमूर सा-यांचा लाडका स्टारकिड बनला आहे. तैमूर सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याच्या बाललीला आणि त्याचा निरागसपणा साऱ्यांनात भावतो.बालपणीच तैमूरची लोकप्रियता बड्या सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. तैमूरने फॅन्सच्या मनात अढळ स्थान मिळवलंय.
वीरे दी वेडिंग २बद्दल निखिलने सांगितले की, आम्हाला वीरे दी वेडिंग २ नक्कीच बनवायचा आहे. आता आम्ही करीना दुसऱ्यांदा आई बनण्याची वाट पाहत आहोत. ती आई झाल्यानंतर आम्ही आनंदात चित्रपटाच्या सीक्वलला सुरूवात करू शकतो. ती प्रेग्नेंसीत प्रत्येक ठिकाणी प्रवास करू शकत नाही. ती आई झाल्यानंतर ती जेव्हा कामावर परतण्यासाठी तयार होईल, तेव्हा आम्ही वीरे दी वेडिंग २ला सुरूवात करू. आम्ही वीरे दी वेडिंगच्या दुसऱ्या भागासाठी खूप उत्सुक आहोत.