सैफ अली खानला Kareena Kapoor नाही तर ही अभिनेत्री वाटते HOT; नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:56 PM2022-01-06T18:56:44+5:302022-01-06T19:07:37+5:30

सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याच्या आपल्या प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप सोडतो.

When saif ali khan says katrina kaif is hotter than wife kareena kapoor | सैफ अली खानला Kareena Kapoor नाही तर ही अभिनेत्री वाटते HOT; नाव वाचून व्हाल थक्क

सैफ अली खानला Kareena Kapoor नाही तर ही अभिनेत्री वाटते HOT; नाव वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याच्या आपल्या प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप सोडतो.  आज आम्ही तुम्हाला सैफशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. खरंतर सैफ अली खान आणि कतरिना कैफ(Katrina Kaif )चा फँटम हा चित्रपट रिलीज होणार होता. त्याच्या प्रमोशनसाठी दोघेही झलक दिखलाजा सीझन 8 च्या सेटवर पोहोचले होते. तिथे करण जोहर आणि शाहिद कपूर जजच्या खुर्चीवर बसले होते. करण जोहरनेही सैफ अली खानची टेर खेचत त्याला सर्वात हॉट अभिनेत्री कोणती वाटते असा प्रश्न विचारला. यासाठी त्याने कतरिना कैफ, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर असे पर्याय दिले.

सैफ म्हणाला की तो खूप प्रोफेशनल आहे आणि त्यानुसार त्याला कतरिना कैफ सर्वात हॉट वाटते. करण आणि बाकीचे स्पर्धक तिथे बसून जोरात हसायला लागले. शाहिदलाही हसू आवरता आले नाही. करणने पुन्हा सैफला विचारले की सर्वात हॉट कोण आहे आणि तो म्हणत आहे की त्याची पत्नी करीना कपूर सर्वात हॉट नाही.  करण जोहरने सैफसोबत नॅशनल टीव्हीवर खूप धमाल केली. सैफला आपण काय बोललो ते नंतर समजले आणि करणच्या प्रश्न रिपीट केल्यावर तो म्हणू लागला की त्याला काहीही ऐकू येत नाही.

सैफला पाहून शाहिद आधीच सावध झाला होता. त्यामुळे जेव्हा शाहिदला हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने पत्नी मीराचे नाव घेत तिला सर्वात हॉट म्हटले. यानंतर त्याने दुसऱ्या क्रमांकावर कतरिना कैफचे नाव घेतले.

Web Title: When saif ali khan says katrina kaif is hotter than wife kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.