'करण-अर्जुन'च्या सेटवर जेव्हा सलमानने शाहरुखवर चालवली होती गोळी, राकेश रोशन यांचा उडाला होता थरकाप, वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:56 AM2024-11-20T11:56:04+5:302024-11-20T11:57:46+5:30
Karan-Arjun Movie : अलीकडेच एका मुलाखतीत राकेश रोशनने 'करण-अर्जुन'च्या सेटवर सलमान-शाहरुखचा एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला.
राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचा १९९५ साली शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) अभिनीत 'करण अर्जुन' (Karan Arjun Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. राकेश रोशन यांचा दिग्दर्शन असलेला चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटानंतर शाहरुख आणि सलमान खानचे स्टारडमही खूप वाढले. पण तुम्हाला माहिती आहे का की, चित्रपटाच्या सेटवर या दोन्ही कलाकारांनी असे काही केले होते जे पाहून राकेश रोशन यांचा थरकाप उडाला होता.
अलीकडेच दिग्दर्शक राकेश रोशन यांनी गलाट्टा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट शेअर केली होती. सेटवर सलमानने शाहरुखवर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा खुलासा राकेश रोशन यांनी केला. मात्र, ते वास्तव नव्हते. सुलतान स्टारने चित्रपटाच्या ॲक्शन डायरेक्टरकडून रिकामी बंदूक घेतली होती आणि सेटवर सगळ्यांची खिल्ली उडवली होती. सेटवर शाहरुख आणि सलमानमध्ये भांडण झाल्याचे नाटक केले आणि सलमानने त्याला 'शूट' केले तेव्हा किंग खान जमिनीवर पडला. राकेशने पुढे सांगितले की, हे पाहून त्यांचे हात थरथरत होते.
दिग्दर्शकाने सलमान-शाहरुखला दिली होती सक्त ताकीद
राकेश रोशन पुढे म्हणाले की, मला आठवतंय मी त्यांना म्हणालो होतो की, असं करू नका यार. हा विनोद आहे का? ही अत्यंत गंभीर बाब आहे. सेटवर एखाद्याला शॉक लागू शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण त्यावेळी ते मुले होते
करण-अर्जुन ठरला होता ब्लॉकबस्टर
रिलीज झाल्यानंतर 'करण-अर्जुन'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवले नाही तर 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर'ही ठरला. त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील दोन मोठे स्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांची कास्टिंग, जे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले. या चित्रपटात काजोल, अमरीश पुरी, राखी गुलजार आणि ममता कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता करण अर्जुन २२ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे.