ते घडले नसते तर आज ही अभिनेत्री असती सलमान खानची पत्नी, सलमाननेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:00 AM2020-04-22T06:00:00+5:302020-04-22T06:00:02+5:30

सलमान १९९४ मध्ये या अभिनेत्रीसोबत लग्न करणार होता असे त्यानेच कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले होते.

When Salman Khan wanted to marry Sangeeta Bijlani PSC | ते घडले नसते तर आज ही अभिनेत्री असती सलमान खानची पत्नी, सलमाननेच दिली होती कबुली

ते घडले नसते तर आज ही अभिनेत्री असती सलमान खानची पत्नी, सलमाननेच दिली होती कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देसंगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले.

सलमानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्याचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. सलमानचे प्यार करोना हे गाणे नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. सलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. सलमानला अनेक मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारलो जातो आणि सलमान हसत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो.

सध्या सलमान युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने किंवा युलियाने कधीच ही गोष्ट मान्य केलेली नाही. सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानीसोबत सलमान लग्न देखील करणार होता. सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा देखील विचार केला होता. जसीम खान यांनी सलमान खानच्या आयुष्यावर बीईंग सलमान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, संगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती. पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने या गोष्टीविषयी अनेक वर्षांनंतर मीडियात कबूल देखील केले होते.

सलमानने देखील ही गोष्ट करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात मान्य केली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते, तिला तो फसवतो आहे हे तिला कळल्यामुळे तिने हे लग्न मोडले होते. सलमानसोबत लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. संगीता आणि सलमानच्या ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानच्या घरातील समारंभात, पार्टींना ती आवर्जून हजेरी लावते.

Web Title: When Salman Khan wanted to marry Sangeeta Bijlani PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.