सलमान खान डेविड धवन यांच्याकडे काम मागायला गेला, तेव्हा धवन यांची होती ही प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:21 IST2018-10-05T13:20:27+5:302018-10-05T13:21:42+5:30
सलमान खानने त्याच्या स्ट्रगलिंग काळातील काही मनोरंजक किस्से सांगितले.

सलमान खान डेविड धवन यांच्याकडे काम मागायला गेला, तेव्हा धवन यांची होती ही प्रतिक्रिया
सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत बनलेली व त्याची बहिण अर्पिता हिचा नवरा आयुष शर्मा याचा सिनेमा 'लवयात्री' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सलमानने एक पत्रकार परीषद घेतली होती. ज्यात त्याने लवयात्री चित्रपटासोबतच त्याच्या स्ट्रगलिंग काळातील मनोरंजक किस्से शेअर केले.
सलमान खान म्हणाला की, स्ट्रगलिंग काळात मी देखील दिग्दर्शक व निर्मात्यांकडे काम मिळावे म्हणून फेऱ्या मारायचो. 1988 साली सलमान मैने प्यार किया चित्रपटातून हिरो म्हणून रुपेरी पडद्यावर झळकला होता. या सिनेमासोबतच दिग्दर्शक डेविड धवनचा आगामी सिनेमा आग का गोला रिलीज झाला होता.
1988 साली सलमान डेविड धवन यांच्याकडे काम मागण्यासाठी गेला होता. याबाबत सलमानने सांगितले की, मी जेव्हा डेविड धवन यांच्याकडे काम मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या बॉडीवर बँडेज लागले होते. खरेतर तिथे जाण्याच्या काही दिवसांपूर्वी माझा अपघात झाला होता. डेविड मला पाहून अवाक झाले आणि म्हणाले की माझ्याकडे काम नाही तुला कुठून देऊ.
सलमान खान व डेविड धवन यांनी बऱ्याच हिंदी सिनेमात एकत्र काम केले आणि हे चित्रपट हिट ठरले आहेत. या यादीमध्ये चल मेरे भाई, बीवी नंबर 1, पार्टनर व जुडवां या चित्रपटांचा समावेश आहे. अभिराज मिनावाला दिग्दर्शित ‘लवयात्री’ हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. राम कपूर आणि रोनित रॉय यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय अरबाज खान आणि सोहेल खान कॅमिओ रोलमध्ये आहेत.