गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने बदललं होतं नाव; 'या' हिंदू नावाचा केला होता स्वीकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:58 PM2023-07-28T13:58:27+5:302023-07-28T13:59:00+5:30
Shah rukh khan: गौरीसोबत लग्न करता यावं यासाठी शाहरुखने प्रचंड धडपड केली होती. त्याने लग्नाच्या वेळी स्वत:चं नाव सुद्धा बदललं होतं.
दमदार अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूड गाजवणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान (shah rukh khan). गेल्या कित्येक दशकांपासून शाहरुखचा कलाविश्वात दांडगा वावर आहे. अभिनेत्यापासून करिअरची सुरुवात करणारा शाहरुख आज एक निर्मिती संस्थेचा मालकदेखील आहे. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा किंग खान म्हटलं जातं. शाहरुखचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चिलं गेलं. तितकंच त्याचं पर्सनल लाइफही चर्चेत येत असतं. यात सध्या त्याच्या लग्नाची आणि खासकरुन त्याच्या नावाची चर्चा होत आहे.
शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठावूक आहे. गौरीसोबत लग्न करता यावं यासाठी शाहरुखने प्रचंड धडपड केली होती. अगदी गौरीच्या घरातल्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी त्याने शक्य होईल ते केलं होतं. इतकंच कशाला त्याने लग्नाच्या वेळी स्वत:चं नाव सुद्धा बदललं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने त्याचं नाव बदलून एका हिंदू नावाचा स्वीकार केला होता. विशेष म्हणजे हे नाव ठेवण्यामागेही एक रंजक किस्सा आहे.
काय आहे शाहरुखचं हिंदू नाव?
गौरीसोबत लग्न करताना शाहरुखने त्याचं नाव बदलून जितेंद्र कुमार तुली असं ठेवलं होतं. हे नाव निवडण्यामागेही एक रंजक किस्सा आहे. शाहरुख थोडासा जितेंद्र आणि राजेंद्र कुमार यांच्यासारखा दिसतो असं त्याच्या आजीला वाटायचं. त्यामुळे या दोन्ही कलाकारांना श्रद्धांजली म्हणून शाहरुखने त्याचं नाव हे ठेवलं होतं. मुश्ताक शेख यांच्या पुस्तकात याविषयी एक किस्सा सांगण्यात आला आहे. तर शाहरुखप्रमाणेच गौरीनेही तिचं नाव बदललं होतं. गौरीने मुस्लीम नावाचा स्वीकार केला होता.
दरम्यान, गौरीचं आणि शाहरुखचं कोर्ट मॅरेजदेखील झालं आहे हे फार कमी जणांना माहित आहे. गौरीच्या कुटुंबाकडून या लग्नाला कडाडून विरोध होता. शाहरुखचा धर्म, त्याचं वय, त्यांची आर्थिक परिस्थिती अशी बरीच कारण होतं ज्यामुळे गौरीच्या कुटुंबियांनी त्याला विरोध केला होता. मात्र, शाहरुखचं असलेलं प्रेम पाहून अखेर त्यांनी या लग्नाला होकार दिला.