Throwback : अरमान कोहलीनं शाहरूखला स्टार बनवलं, पण स्वत: इंडस्ट्रीतून बाद झाला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 06:37 PM2023-03-24T18:37:51+5:302023-03-24T18:40:54+5:30

Shah Rukh Khan, Armaan Kohli : कधीकाळी शाहरूखने अरमान कोहलीचे जाहिर आभार मानले होते. अरमान कोहलीमुळे मी स्टार झालो, असं शाहरूख म्हणाला होता.

when shah rukh khan said armaan kohli is responsible for making me a star | Throwback : अरमान कोहलीनं शाहरूखला स्टार बनवलं, पण स्वत: इंडस्ट्रीतून बाद झाला...!!

Throwback : अरमान कोहलीनं शाहरूखला स्टार बनवलं, पण स्वत: इंडस्ट्रीतून बाद झाला...!!

googlenewsNext

शाहरूख खानच्या (ShahRukh Khan) पठाण या सिनेमाच्या चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं बक्कळ कमाई केली. गेल्या २२ मार्चला हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम झाला. ओटीटीवर या सिनेमाचं एक्सटेंडेड व्हर्जन रिलीज करण्यात आलं. हे व्हर्जन पाहून चाहते खूश्श आहेत. शाहरूख आज भलेही बॉलिवूडचा किंग म्हणवला जातो. पण एकेकाळी याच शाहरूखला काम मिळत नव्हतं. अनेक स्टार्सनी रिजेक्ट केलेल्या भूमिका त्याने या काळात केल्या. याचदरम्यान अभिनेता अरमान कोहलीनं नाकारलेल्या एका सिनेमानं शाहरूखला स्टार बनवलं, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.
कधीकाळी शाहरूखने अरमान कोहलीचे जाहिर आभार मानले होते. अरमान कोहलीमुळे मी सुपरस्टार झालो, असं शाहरूख म्हणाला होता. आता शाहरूखला सुपरस्टार बनवण्यात अरमान कोहलीचं काय योगदान? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे...

2016 साली ‘यारों की बारात’ शोमध्ये खुद्द शाहरूखने याचा खुलासा केला होता. माझ्या यशात अरमान कोहलीचा मोठा वाटा आहे. माझ्या यशाचं श्रेय मी त्यालाही देतो,असं शाहरूख म्हणाला होता. याचे कारण म्हणजे, ‘दीवाना’ हा सिनेमा. होय, ‘दीवाना’ या सिनेमासाठी शाहरूख खानआधी अरमान कोहलीला साईन करण्यात आलं होतं. अगदी चित्रपटाचं एक शेड्यूलही त्यानं शूट केलं होतं. चित्रपटाचं पोस्टर देखील छापून तयार होतं. या पोस्टरवर अरमान दिव्या भारतीसोबत झळकला होता. आजही हे पोस्टर शाहरूखने जपून ठेवलं आहे. पण मग काही कारणास्तव अगदी ऐनवेळी अरमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि यानंतर हा सिनेमा शाहरूखला मिळाला. ‘दीवाना’ सुपरहिट झाला आणि शाहरूख एका रात्रीत स्टार झाला.


शाहरूखला सुपरस्टार बनवण्यात मोठा वाटा असलेला हा अरमान कोहली आता कुठे आहे तर जणू इंडस्ट्रीतून गायब झाला आहे. अरमान कोहलीने 1992 साली ‘विरोधी’ या सिनेमातून डेब्यू केला होता. अरमान हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. बदले की आग आणि राज तिलक या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.
विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या  सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता. यादरम्यान तनीषा मुखर्जीसोबतचं त्याचं अफेअर गाजलं होतं. यानंतर तो सलमानच्या प्रेम रतन धन पायो या सिनेमात झळकला. तेव्हापासून तो मोठ्या पडद्यावरून गायब आहे.

Web Title: when shah rukh khan said armaan kohli is responsible for making me a star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.