Throwback : मी कधीच अक्षयसोबत काम करू शकत नाही..., जेव्हा शाहरूखने सांगितलं होतं इंटरेस्टिंग कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:00 AM2022-12-16T08:00:00+5:302022-12-16T08:00:02+5:30
Akshay Kumar and Shah Rukh Khan : अक्षय व शाहरूख दोघांनाही एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. पण 'दिल तो पागल है' नंतर इतक्या वर्षांत कधीही हा योग जुळून आला नाही. यामागचं कारण काय?
Akshay Kumar and Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सनी एकत्र काम केलंय. पण काही अपवाद आहेतच. होय, शाहरूख खान व अक्षय कुमार या दोघांचंच उदाहरण घ्या. ‘दिल तो पागल है’ या सिनेमातील अक्षयचा कॅमिओ सोडला तर अक्षय व शाहरूख कधीही एकत्र झळकले नाहीत. खरं तर अक्षय व शाहरूख दोघांनाही एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. पण इतक्या वर्षांत कधीही हा योग जुळून आला नाही. यामागचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे. होय, खुद्द शाहरूखने एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं होतं.
अक्षयसोबत काम न करण्याचं कारण काय? असा प्रश्न शाहरूखला विचारण्यात आला होता. यावर शाहरूखने कारण स्पष्ट केलं होतं.
‘आता मी यावर काय बोलू? आमचं टायमिंग मॅच होत नाही, हेच यामागचं कारण आहे. मी त्याच्यासारखा पहाटे उठू शकत नाही. मी झोपायला जातो ती त्याची सकाळी उठण्याची वेळ असते. त्याचा दिवस लवकर सुरू होतो. जेव्हा मी कामाला सुरुवात करतो त्यावेळी त्याचं पॅकअप सुरू होतं. तो घरी जाण्यासाठी तयार असतो. मी रात्री जागणारा व्यक्ती आहे. माझ्यासारखी इतरांना रात्री काम करण्याची सवय नाहीये. मी आणि अक्षयने एकत्र काम करायचं ठरवलं तरी आमची सेटवर भेटच होणार नाही. मला त्याच्यासोबत काम करायचं आहे पण आमच्या वेळेची अडचण आहे. आमचा टायमिंग मॅच न होणारा आहे,’असं शाहरूख म्हणाला होता.
अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'दिल तो पागल है' 1997 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट शाहरुखच्या चित्रपट कारकिर्दितील सर्वात सुपरहिट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात शाहरुखसोबत माधुरी दीक्षित तर अक्षय कुमारसोबत करिश्मा कपूर या अभिनेत्री दिसल्या होत्या. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे शाहरुख- अक्षयची जोडी हीट झाली होती. पण त्यानंतर या दोघांनी कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केलं नाही.