शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:17 PM2019-04-19T15:17:40+5:302019-04-19T15:18:18+5:30

आता शिल्पाचा एक व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत शिल्पा तिचा मुलगा वियानला मांडीवर घेऊन व्यायाम करताना दिसत आहे.

When Shilpa Shetty Swapped Weights For 6-Year-Old Son Viaan In Mom-Special Work-Out | शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार

शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पाचा हा व्हिडिओ सध्या सगळ्यांनाच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे की, आज पार्टनर्स वर्कआऊट डे आहे. तसेच या व्हिडिओत आई होणे हे सोपे नसते असे बोलताना शिल्पा दिसत आहे. 

वयाच्या 43 व्या वर्षीही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उत्तम फिगर बॉलिवूडच्या कोणत्याही न्यूकमर अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी पुरेशी आहे. ती कामात कितीही व्यग्र असली तरी ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. ती अनेक तास जिममध्ये घाम गाळते. तसेच फिटनेससाठी नेहमीच योगाचा आधार घेताना दिसते. आपल्या चाहत्यांना आणि फिटनेस फ्रिक असणाऱ्या लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तिने त्यावर आधारित एक सीडीही रिलिज केली होती. 

शिल्पा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच डेली वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिच्या फिटनेस सिक्रेटविषयी ती तिच्या चाहत्यांना सांगत असते. तसेच तिच्या फॅन्सना देखील फिट राहाण्यासाठी प्रोत्साहन देते. आता शिल्पाचा एक व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत शिल्पा तिचा मुलगा वियानला मांडीवर घेऊन व्यायाम करताना दिसत आहे. तसेच व्यायाम करण्यासाठी वियान तिला प्रोत्साहन देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ सध्या सगळ्यांनाच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे की, आज पार्टनर्स वर्कआऊट डे आहे. तसेच या व्हिडिओत आई होणे हे सोपे नसते असे बोलताना शिल्पा दिसत आहे. 

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर 3 या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. ती सुपर डान्सरमुळे छोट्या पडद्यावर अनेक वर्षांपासून काम करत असली तरी ती चित्रपटांपासून दूरच आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या ढिशक्याऊँ या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नव्हती. या नंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. 

शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. तसेच या चित्रपटात काजोल देखील मुख्य भूमिकेत होती. शिल्पाच्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले होते. तिने धडकन, लाइफ इन मेट्रो, परदेसी बाबू यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: When Shilpa Shetty Swapped Weights For 6-Year-Old Son Viaan In Mom-Special Work-Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.