श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:41 PM2023-03-16T16:41:09+5:302023-03-16T16:41:50+5:30

Shraddha kapoor: या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धाने तिच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा केला. यात शाळेत असताना तिला कॉपी करताना शिक्षकांनी पकडल्याचं तिने सांगितलं.

when shraddha kapoor was caught red handed while cheating then what happened | श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी

श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी

googlenewsNext

बॉलिवूडमधील मोस्ट चुलबूली गर्ल श्रद्धा कपूर (shraddha kapoor) सध्या तिच्या 'तू झूठी मैं मक्कार' (tu jhoothi main makkaar) या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटात श्रद्धासोबत अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) याने स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने १५.७३ कोटींची कमाई केली. त्यामुळे हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धाने तिच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा केला. यात शाळेत असताना तिला कॉपी करताना शिक्षकांनी पकडल्याचं तिने सांगितलं.

अलिकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना श्रद्धाने परिक्षेत कॉपी केली होती. परंतु, तिची कॉपी शिक्षकांनी पकडली, असा खुलासा केला.

"आपण प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या परिक्षेत कॉपी नक्कीच केली आहे. माझा अभ्यास झाला नव्हता म्हणून मी काही प्रश्नांची उत्तरं माझ्या फ्रॉकच्या खालती लिहून ठेवली होती. मला वाटलं, व्वा काय आयडिया आहे. असं केल्यामुळे मला कोणीच पकडणार नाही. पण, मी पेपर सुरु असताना उत्तर पाहणार तोच शिक्षक माझ्या बाजूला उभे होते. आणि, श्रद्धा म्हणून ते जोरात ओरडले. आणि, माझी चोरी पकडली गेली", असं श्रद्धा म्हणाली.

दरम्यान,  'तू झूठ मैं मक्कार' या सिनेमाची निर्मिती लव फिल्म्स आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. तर 'तू झुठी मै मक्कार' सिनेमामध्ये रणबीर कपूर, श्रद्धा कपूर सोबतच बोनी कपूर यांनी देखील अभिनयात पदार्पण केले आहे. तर डिंपल कपाडियाही मुख्य भूमिकेत आहे.
 

Web Title: when shraddha kapoor was caught red handed while cheating then what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.