श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:28 PM2021-03-12T19:28:48+5:302021-03-12T19:33:18+5:30

Shweta Bachchan Sister-In-Law Aishwarya Rai Bachchan Bonding: मुळात ऐश्वर्याचे लग्नापूर्वीपासूनच बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांसोबत अतिशय चांगले नाते आहे. अभिषेकची बहीण श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगली मैत्रीही असल्याचे बोलले जाते.

When Shweta Bachchan Says she 'hates' THIS about sister-in-law Aishwarya Rai Bachchan On National Tv | श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट

श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. 

बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा वहिनी ऐश्वर्यासोबतचे तिच्या बॉन्डींगमुळे ती चर्चेत आली आहे. 

मुळात ऐश्वर्याचे लग्नापूर्वीपासूनच बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांसोबत अतिशय चांगले नाते आहे. अभिषेकची बहीण श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगली मैत्रीही असल्याचे बोलले जाते. पण ऐश्वर्याची एक गोष्ट श्वेताला अजिबातच आवडत नाही. तिच्या या गोष्टीमुळे तिचा अनेकवेळा रागदेखील येतो अशी कबुली श्वेताने 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात दिली होती. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात श्वेता आणि अभिषेकने काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती.

त्यावेळी श्वेताला ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही असे विचारले होते. त्यावर लगेचच श्वेताने सांगितले होते की, ऐश्वर्या माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आज तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीवर तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. पण तिला फोन केला किंवा मेसेज केला तर त्यावर ती कधीच लवकर रिप्लाय देत नाही. तिची ही गोष्ट मला अजिबातच आवडत नाही.

ऐश्वर्या प्रसिद्धीच्या झोतात असताना तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न करत सा-यांना मोठा धक्का दिला होता. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी असून आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने चित्रपटात काम करणे खूपच कमी केले आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलीला देते.

Web Title: When Shweta Bachchan Says she 'hates' THIS about sister-in-law Aishwarya Rai Bachchan On National Tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.