सोनाक्षी सिन्हाला १८व्या वर्षीच करायचं होतं लग्न, पण...; अभिनेत्रीने स्वत:च केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:29 PM2024-06-14T16:29:10+5:302024-06-14T16:29:31+5:30

Sonakshi Sinha Marraige : सोनाक्षीला १८व्या वर्षीच लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं. एका मुलाखतीत तिने लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितलं होतं.

when sonakshi sinha said that she wanted to be married at the age of 18 and having kids | सोनाक्षी सिन्हाला १८व्या वर्षीच करायचं होतं लग्न, पण...; अभिनेत्रीने स्वत:च केला होता खुलासा

सोनाक्षी सिन्हाला १८व्या वर्षीच करायचं होतं लग्न, पण...; अभिनेत्रीने स्वत:च केला होता खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे गेल्या काही दिवसांपासून लाइमलाईटमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल सोबत लग्नाच्या बेडीत अडकून संसार थाटणार आहे. २३ जूनला सोनाक्षी आणि जहीर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पस्तीशी उलटल्यानंतर सोनाक्षी तिच्या वैवाहिक आयुष्यात पाऊल टाकत आहे. पण, खरं तर सोनाक्षीने १८व्या वर्षीच लग्नाची स्वप्नं बघितली होती. 

सोनाक्षीला १८व्या वर्षीच लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं. एका मुलाखतीत तिने लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितलं होतं. "मी अशी मुलगी होते जिला मोठं होऊन फक्त लग्न करायचं होतं. माझं एकच स्वप्न होतं ते म्हणजे लग्न करणं. लग्नानंतर किती मुलं होणार, त्यांची नावं काय असणार, या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला होता. १८ वर्षांची झाल्यावर लग्न करायचं हे एकच ध्येय होतं. माझ्या इतर सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आहेत. त्यांना मुलंदेखील आहेत. पण, माझं अजूनही लग्न झालेलं नाही," असं सोनाक्षी Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. 

पुढे तिने सांगितलं की, "माझे आईवडील मला लग्न कर असं म्हणायचे. पण, नंतर त्यांनाही कळलं की मी माझ्या कामात खूश आहे. आणि मी सगळ्या गोष्टी माझ्या मर्जीने करत असल्याने त्यांना हे माहीत आहे की जेव्हा मला लग्न करायचं आहे. मी तेव्हाच ते करणार. मग, कोणी काहीही म्हणू दे". 

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जहीरदेखील मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. सोनाक्षीच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. 
 

Web Title: when sonakshi sinha said that she wanted to be married at the age of 18 and having kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.