रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीचा झालेला तिळपापड; सिनेमातील सीन करायला लावले होते कट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:38 PM2022-03-15T16:38:44+5:302022-03-15T16:38:59+5:30
Reema lagoo: रिमा लागू यांचा अभिनय इतका दमदार होता की त्यामुळे चित्रपटातील साईड रोल्सदेखील त्या सुपरहिट करायच्या.
मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. आज रिमा लागू यांचं निधन होऊन बरीच वर्ष झाली. मात्र, तरीदेखील त्या प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत. अनेकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चाही रंगत असते. रिमा लागू यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत २५ पेक्षा जास्त वेळा आईची भूमिका वठवली. इतकंच नाही तर रिमा लागू यांनी जवळपास ७ वेळा सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे कोणत्याही मोठ्या चित्रपटात आईची भूमिका असली की प्रथम रिमा लागू यांचा विचार केला जायचा. परंतु, हिंदी कलाविश्वातील त्यांची लोकप्रियता पाहता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मात्र तिळपापड झाला होता असं सांगण्यात येतं.
रिमा लागू यांचा अभिनय इतका दमदार होता की त्यामुळे चित्रपटातील साईड रोल्सदेखील त्या सुपरहिट करायच्या. विशेष म्हणजे त्यांच्या याच कलागुणांमुळे श्रीदेवी बेचैन झाल्या होत्या.
रिमा लागूंमुळे श्रीदेवी झाल्या होत्या इनसिक्युअर?
'गुमराह' या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात श्रीदेवी लीड रोलमध्ये होत्या. तर, रिमा लागू या श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारत होत्या. परंतु, रिमा लागू यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी इनसिक्युअर झाल्या होत्या.
..म्हणून रिमा लागूंचे सीन श्रीदेवींनी केले कट
चित्रपटातील रिमा लागू यांचा अभिनय पाहून श्रीदेवी फक्त इनसिक्युअरच झाल्या नाहीत. तर, त्यांनी रिमा लागू यांचे अनेक सीन चित्रपटातून कट करायला लावले. विशेष म्हणजे त्याकाळी श्रीदेवी टॉपची अभिनेत्री होत्या. तरीदेखील त्यांच्या मनात एक प्रकारची भीती होती. इतकंच नाही तर श्रीदेवी टॉपची अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनीही रिमा लागू यांचे सीन कट केले होते.
दरम्यान, रिमा लागू यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात खासकरुन अजय देवगण, शाहरुख खान, करिश्मा कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, गोविंदा, उर्मिला मातोंडकर आणि काजोल या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली आहे.