अन् सनी लिओनीला वडिलांनी नको त्या अवस्थेत पकडले आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:12 IST2020-06-04T16:10:31+5:302020-06-04T16:12:09+5:30
‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी सनीने स्वत: तिच्या फर्स्ट किसचा किस्सा शेअर केला होता. तिचा हा अनुभव तिच्यासाठी खूपच शॉकिंग होता.

अन् सनी लिओनीला वडिलांनी नको त्या अवस्थेत पकडले आणि मग...
बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्डनेसच्या जोरावर एक खास ओळख निर्माण करणारी सनी लिओनी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. पण सनीने सगळ्यांवर मात केली. आज सनी तीन मुलांची आई आहे. याच सनीची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होतेय. या मुलाखतीत सनीने तिच्या पहिल्या किसबद्दल सांगितले आहे.
‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी सनीने स्वत: तिच्या फर्स्ट किसचा किस्सा शेअर केला होता. तिचा हा अनुभव तिच्यासाठी खूपच शॉकिंग होता.
केवळ 13 वर्षांची असताना सनी पहिल्यांदा प्रेमात पडली होती. तर टीनएजमध्ये असताना सनीचे कुटुंबीय मिशिगनहून कॅलिफोर्नियात शिफ्ट झाले होते. सनीने सांगितले होते, ‘मिशिगनला आम्ही वर्षभर राहिलो. येथे मला एक हॉट मुलगा भेटला. तो अतिशय हॉट होता. तो मुलगा दररोज मला लव्ह लेटर लिहायचा. त्या वयात प्रेमाचा अर्थही कळत नव्हता. पण मी त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते.
रोमियो अॅॅण्ड ज्युलिएट हे नाटक त्याने मी सोबत पाहिले आणि यानंतर आम्ही दोघांनी पहिला किस केला. तो अनुभव अद्भूत होता. पण प्रेम बहरत असतानाच कॅलिफोर्निया सोडून मला जावे लागणार होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील हार्ट फेल करणारा क्षण होता. तो मुलगा बास्केटबॉल खेळायचा. हॉट आणि हॅण्डसम होता. पण माझे पेरेंट्स त्याचा राग करायचे. त्याचे कारण म्हणजे, एकेदिवशी मी व माझा तो बॉयफ्रेन्ड एका मोठ्या हॉलच्या कोप-यात बसलो होतो. मी त्याच्या मिठीत होते. आम्ही इंटिमेट होणार, तोच त्याठिकाणी माझे पप्पा आले. पप्पांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि मी खूप घाबरले. ती घटना मी कधीही विसरू शकत नाही. ती माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट घटना होती.