सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:18 IST2021-03-20T14:13:08+5:302021-03-20T14:18:59+5:30

Sara Ali Khan has One Conditon For Marraige: आपल्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हे फोटोशूट शेअर करत तिने अशी काय कॅप्शन लिहीली की, सध्या तिच्या याच कॅप्शनने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

When Susheel, Sanskari,Gharelu Ladki Sara Ali Khan Revealed whom she wanted to Marry, Read on | सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यांत  रसिकांचे लाडके कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. यामुळेच की काय सारा अली खानलाही आत्तापासूनच  लग्नाचे वेध लागले आहेत. नुकतेच सारा अली खानने ब्राइडल फोटोशेट केले. लेहंग्यात सारा अली खान फारच सुंदर दिसतेय.

आपल्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हे फोटोशूट शेअर करत तिने अशी काय कॅप्शन लिहीली की, सध्या तिच्या याच कॅप्शनने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कारी, घेरलू, सुशील मुलीसाठी काही लग्नाचे प्रपोजल आहेत का? या फोटोशूटच्या निमित्ताने का होईन सारानेही आता लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे. 


मात्र साराचं तिचं लग्न सर्वसामान्यपणे नाही तर थोडं हटके पद्धतीने व्हावं अशी तिची इच्छा आहे.  आपलंही लग्न राजेशाही थाटात व्हावं असं तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. तिला ‘स्वप्नवत’असे लग्न करायचं आहे.आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं साराने सांगितले. एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे. मात्र सध्या तरी आपण सिंगल आहोत हे सांगायलाही ती विसरली नाही. त्यामुळे अनेक डाय हार्ट फॅन असलेल्या तरुणांसाठी ही गोष्ट नक्कीच सुखावणारी म्हणावी लागेल.

तसेच सारा गेल्या काही दिवसांपासून आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अकाऊंटवरील तिचे काही फोटोंमुळे ही चर्चा रंगत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये सारा दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडासोबत सतत एकत्र पाहायला मिळत आहेत. दोघांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळत आहेत. 

साराची विजय देवरकोंडासह वाढती मैत्रीच्या चर्चा आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचल्या आहेत. त्यामुळेच सारा अली खान विजय देवरकोडांसह रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या लव्हबर्ड्सचं चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. चोरी चोरी -चुपके चुपके या दोघांमध्ये रिअल लव्हस्टोरी फुलू लागली असल्याचे संकेत वारंवार दोघे देत असतात. 

Web Title: When Susheel, Sanskari,Gharelu Ladki Sara Ali Khan Revealed whom she wanted to Marry, Read on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.