दत्तक मुलींमुळे सुश्मिताला मिळणार नाही वडिलांची संपत्ती?; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:19 PM2023-08-28T13:19:07+5:302023-08-28T13:20:54+5:30

Sushmita sen: वडिलांच्या संपत्तीमधून बेदखल झाली सुश्मिता?

when sushmita-sen-adopted-renee-her-mom-was-furious-and-dad-supported | दत्तक मुलींमुळे सुश्मिताला मिळणार नाही वडिलांची संपत्ती?; अभिनेत्रीने केला खुलासा

दत्तक मुलींमुळे सुश्मिताला मिळणार नाही वडिलांची संपत्ती?; अभिनेत्रीने केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (sushmita sen) हिची 'ताली' (taali) ही वेबसीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये तिने केलेल्या अभिनयामुळे सध्या सर्व स्तरामधून तिचं कौतुक केलं जात आहे.  बऱ्याचदा अभिनयामुळे चर्चेत येणारी सुश्मिता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वडिलांच्या संपत्तीविषय़ी मोठं वक्तव्य केलं. तिच्या वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती सुश्मिताच्या दत्तक मुलींच्या नावे केली.

सुश्मिताने फार कमी वयामध्ये दोन मुलींना दत्तक घेतल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. विशेष म्हणजे या मुलींवर सुश्मिता पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम करते. केवळ सुश्मिताच नाही तर तिच्या घरातील प्रत्येक सदस्य या मुलींना जीवापाड जपतात. त्यामुळेच सुश्मिताच्या वडिलांनीही त्यांच्या संपत्तीमधील काही भाग आपल्या लेकीला न देता या नातींना दिला. याविषयी सुश्मिताने मुलाखतीमध्ये सांगितलं.

"या भेटीमध्ये एक भावनिक बंध निर्माण होत होते. मी विचार करत होते ही एक किती मोठी दरी आहे. कुणाला तरी आई व्हायचंय आणि एक लहान मूल आहे त्याला आई हवीये. मग हे सगळं सोपं का होऊ शकत नाही. माझ्या काही वर्षांचा प्रवास आणि मुलांच्या अवतीभोवती असण्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे मी आई होण्यास तयार असल्याचं मला जाणवलं. मी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला हे माझ्या आईला पटलं नव्हतं. एवढ्या लहान वयात मी दोन मुलींची आई होणं आईला मान्य नव्हतं. ती चिडली होती", असं सुश्मिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी ३० वर्षांची असताना रिनीला दत्तक घेतलं. त्यावेळी माझ्या वडिलांचा मला पाठिंबा होता. कायद्याचा भाग म्हणून त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती रिनीच्या नावावर केली. तर दुसरीकडे  माझी आई चिडली होती. तू स्वत: एक लहान मूल आहेस आणि दुसरं मूल काय दत्तक घेतेस? असं विचारलं. त्यावर माझ्या वडिलांनी मला मूल दत्तक घेण्यामागचं कारण विचारलं. मी माझं कारण सांगितलं. माझं कारण त्यांना पटलं आणि ते हसले. वडिलांचा पाठिंबा होता त्यामुळे कोर्टाने मला रिनी दत्तक दिली. त्यांच्याशिवाय मी काहीच करु शकले नसते."

दरम्यान, सुश्मिताने खूप कमी वयामध्ये दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. विशेष म्हणजे सुश्मिता या मुलींचा अत्यंत उत्तमरित्या सांभाळ करत आहे. बऱ्याचदा सुश्मिता सोशल मीडियावर तिच्या लेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते.

Web Title: when sushmita-sen-adopted-renee-her-mom-was-furious-and-dad-supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.