किस्सा! बॉयफ्रेन्ड गे असल्याचं समजल्यावर काय होती सुष्मिता सेनची प्रतिक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:04 PM2022-02-24T14:04:43+5:302022-02-24T14:07:21+5:30

Sushmita Sen : सुष्मिताच्या या एक्स बॉयफ्रेन्डच्या लिस्टमध्ये एक नाव आहे पॉप स्टार रिकी मार्टिन. त्यांच्या नात्याला बरीच वर्ष झाली. पण त्यावेळी त्यांची खूपच चर्चा झाली होती. चला जाणून यांच्याबाबतचा एक किस्सा....

When Sushmita Sen come to know about her boyfriend Ricky Martin is gay | किस्सा! बॉयफ्रेन्ड गे असल्याचं समजल्यावर काय होती सुष्मिता सेनची प्रतिक्रिया?

किस्सा! बॉयफ्रेन्ड गे असल्याचं समजल्यावर काय होती सुष्मिता सेनची प्रतिक्रिया?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या अफेअर्समुळे चर्चेत होती. केवळ एकच नाही तर अनेक अभिनेते मॉडल्ससोबत तिचं नाव जोडलं गेलं. पण अजूनही ती अविवाहित आहे. तिच्या या एक्स बॉयफ्रेन्डच्या लिस्टमध्ये एक नाव आहे पॉप स्टार रिकी मार्टिन (Ricky Martin). त्यांच्या नात्याला बरीच वर्ष झाली. पण त्यावेळी त्यांची खूपच चर्चा झाली होती. चला जाणून यांच्याबाबतचा एक किस्सा....

सुष्मिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. तेव्हा तिने लिहिलं होतं की, जुना फोटो शेअर करत आहे. आमची भेट मेक्सिकोमध्ये झाली होती. मी १८ चे होते तर रिकी २२ चा होता. आता मी दोन मुलींची आई आहे  आणि रिकी दोन मुलांचा वडील. आमची कहाणी फार सुंदर होती. रिकीसाठी फार आनंदी आहे'.

२०१० साली रिकीने मीडियासमोर येऊन सांगितलं होतं की, तो गे आहे. त्यानंतर जेव्हा यााबाबत सुष्मिताला विचारण्यात आलं तर ती म्हणाली होती की,'मला हे आधीपासूनच माहीत होतं. मला त्याच्यावर गर्व आहे. ही बाब सांगण्यासाठी मोठ्या हिंमतीची गरज लागते. मला माहीत होतं की, तो गे आहे'.

नंतर रिकीने एका रॅंप वॉकनंतर सांगितलं होतं की, 'मी लग्न केलं आहे. पण मी यासाठी कोणत्या भव्य पार्टीचं आयोजन केलं नव्हतं. आम्ही एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. आता आम्ही सर्वांना आमच्या नात्याबाबत सांगण्याचा निर्णय घेतला'.

'ही जाणीव फारच आनंद देणारी आहे. मला त्याची माझ्या फियान्सेसारखं ओळख करून द्यायची नव्हती. आता तो माझा पती आहे'. रिकी आता दोन मुलांचा वडिल आहे. तो एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'मी गे असल्याचं तेव्हाच सांगणार होतो जेव्हा माझ्या मुलांनी जन्म घेतला होता. पण मला सांगण्यात आलं की, मी असं केलं असतं तर माझं करिअर संपेल'.
 

Web Title: When Sushmita Sen come to know about her boyfriend Ricky Martin is gay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.