'तुझ्या वयाच्या मुली...'; वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:26 IST2024-02-01T14:25:22+5:302024-02-01T14:26:05+5:30
Tabu: शबाना आझमी यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत किसिंग सीन दिला. हा सीन कलाविश्वात चांगलाच गाजला.

'तुझ्या वयाच्या मुली...'; वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली
करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा सिनेमा अलिकडेच रिलीज झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, या सिनेमात या जोडीपेक्षा धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या किसिंग सीनची जबरदस्त चर्चा झाली. जुलै २०२३ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाच्या माध्यमातून धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली. विशेष म्हणजे उतरत्या वयात या जोडीने किसिंग सीन दिल्यामुळे त्यांची प्रेक्षकांमध्ये आणि कलाविश्वात तुफान चर्चा झाली. यामध्ये अभिनेत्री तब्बू हिने मजेशीर अंदाजात शबाना आझमी यांना चांगलाच टोला लगावला होता. याविषयीचा खुलासा नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.
अलिकडेच शबाना आझमी यांनी zoom ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात किसिंग सीन दिल्यानंतर लोकांकडून कशा प्रतिक्रिया आल्या हे त्यांनी सांगितलं. इतकंच नाही अभिनेत्री तब्बू हिने कशी त्यांची मस्करी केली होती हे सुद्धा त्यांनी सांगितलं.
शबाना आझमीच्या किसिंग सीनवर काय होती तब्बूची प्रतिक्रिया
"तब्बू, जी की माझी भाची सुद्धा आहे. ती इतकी आगाऊ आहे की, मला म्हणते तू सगळ्या इंडस्ट्रीला हलवून टाकलं आहेस. आता तुझ्या वयाच्या सगळ्या मुली म्हणतायेत की किसिंग सीन असेल तर आम्ही करणार. तू खरंच इंडस्ट्रीला हदरवून टाकलं आहेस", असं शबाना आझमी यांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीही शबाना यांनी झूमला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी या किसिंग सीनवर स्वत:ची प्रतिक्रिया दिली होती. या एका सीनमुळे एवढा गोंधळ होईल असा विचार सुद्धा मी कधी केला नव्हता. हा सीन शूट होताना सेटवर सगळे हसत होते. त्यावेळी या सीनची एवढी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं. यापूर्वी मी कधीच फार किसिंग सीन केले नाहीत. पण, धर्मेंद्र सारख्या हँडसम व्यक्तीला किस करणं कोणाला आवडणार नाही?, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.