अक्षय कुमारच्या ‘त्या’ कारनाम्यामुळे ट्विंकलला झाली होती अटक, चारचौघात केलेलं ‘ते’ कृत्य पडलं होतं महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:59 PM2021-06-17T16:59:14+5:302021-06-17T18:24:05+5:30
काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारनं फॅशन शोमध्ये असे काही केलं की ज्यामुळे चाहत्यांचा रागाचा पारा चढला होता.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ( Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna ) बॉलिवूडचे एक लोकप्रिय कपल. साहजिकच या कपलची चर्चाही भारी. अक्षय व ट्विंकल सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. पण 2009 साली हे कपल एका वेगळ्याच आणि वादग्रस्त कारणामुळे चर्चेत आले होते. होय, अगदी अक्षयमुळे ट्विंकलला अटकही झाली होती.
तर इव्हेंट होता फॅशन शोचा. या इव्हेंटमध्ये अक्षय कुमार एका जीन्स ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी पोहोचला होता. जीन्सच्या ब्रँडचे नाव होते, ‘अनबटन्ड’.
तर जीन्स ब्रँड प्रमोट करण्यासाठी अक्षय कुमार रॅम्प वॉक करणार होता आणि स्क्रिप्टनुसार, रॅम्प वॉकदरम्यान एका मॉडेलकडून अक्षय त्याच्या जीन्सचे बटण खोलून घेणार होता. शो सुरू झाला. निळ्या रंगाची वॉश्ड पॅटर्न जीन्स आणि ब्रँडचा लोगो असणारे ग्रीन स्लीव्हलेस टी-शर्ट घालून अक्षय रॅम्प वॉकसाठी उभा राहिला. अक्षयला पाहून सगळेच उत्साहात होते. ट्विंकल सुद्धा अक्षयचा रॅम्प वॉक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत हजर होती.
शो सुरू झाला आणि रॅम्पवर अचानक अक्षयला कुरापत सुचली. होय, रॅम्प वॉकनंतर अक्षय अचानक प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसलेल्या आपल्या पत्नीकडे अर्थात ट्विंकलकडे वळला आणि थांबला.
अक्षय असा अचानक थांबल्याने ट्विंकल, प्रेक्षक आणि शोचे आयोजक थोडेसे चक्रावले. कारण शोच्या स्क्रिप्टमध्ये असे काहीच नव्हते. अक्षय पत्नीजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने जीन्सच्या बटणाकडे इशारा केला. त्याने ट्विंकलला जीन्सचे बटण उघडण्यास सांगितले. ट्विंकल क्षणभर गोंधळली. तिने असे करण्यास नकार दिला. पण अक्षय मानेना. त्याने हात पकडून तिला जीन्सचे बटण उघडायला भाग पाडले. अखेर तिने खिलाडी कुमारच्या जीन्सचे बटण उघडले. लोकांनी जल्लोषात टाळ्या वाजवल्या आणि शो संपला. पण यानंतर खरा गोंधळ सुरु झाला. या रॅम्पवॉकचे व्हिडीओ व्हायरल झालेत आणि अक्षय व ट्विंकलचा हा कारनामा पाहून लोक संतापले.
एका व्यक्तीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. अगदी ट्विंकलच्या नावाचा अटक वॉरंटही जारी झाला. या प्रकरणी ट्विंकल खन्नाला एकटीलाच दोषी ठरवण्यात आले होते आणि 500 रुपये दंड भरल्यानंतर तिला जामिन मंजूर झाला होता.
पुढे या मुलाखतीत ट्विकल खन्ना यावर बोलली होती. ‘ त्या रॅम्पवॉकच्या दुस-या दिवशीच अक्षयला पद्मश्री सन्मान मिळणार होता. त्यासाठी आम्ही राष्ट्रपती भवनात पोहचलो होता. तिथे पोहचताच मला माझ्या आईचा मेसेज मिळाला. पोलिसांकडे तुझे अरेस्ट वॉरंट आहे आणि ते तुला शोधत आहेत, असे या मॅसेजमध्ये लिहिले होते, असे तिने सांगितले होते.