​सोनाक्षीची ही इच्छा कधी पूर्ण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 08:08 PM2016-12-18T20:08:46+5:302016-12-19T10:20:44+5:30

बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मते सिनेस्टारच्या मुलांना गर्दीपासून दूर सामान्य जीवन जगण्याची ...

When will this dream of Sonakshi be fulfilled? | ​सोनाक्षीची ही इच्छा कधी पूर्ण होणार?

​सोनाक्षीची ही इच्छा कधी पूर्ण होणार?

googlenewsNext
ong>बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मते सिनेस्टारच्या मुलांना गर्दीपासून दूर सामान्य जीवन जगण्याची इच्छा असते. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या हिने लिहलेल्या पुस्तकाचे विमोचन करताना ती बोलत होती. 

सोनाक्षी म्हणाली, प्रसिद्ध चित्रपट कलावंतांची मुलांभोवती नेहमीच लोकांच्या गर्दी जमते. मात्र त्यांना सामान्य जीवन जगण्याची इच्छा होते. मला असे वाटते यात आई-वडिलांना संतुलन निर्माण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. माझे लहाणपण चांगले होते, मात्र काही ठिकाणी मला आश्चर्यजनक रुपाने प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी मला सामान्य जीवन जगायचे होते. 

यावेळी सोनाक्षीने आपल्या जीवनातील एक अनुभव शेअर केला. ती म्हणाली, मी १४ वर्षांची असताना एक कार्यक्रमासाठी वडिलांसोबत गेली होती. तेव्हा लोक मला आटोग्राफ मागायला लागले. मला लोकांनी वेढले, ते मला अजीबात आवडले नाही, मी येथे आली नसती हेच बरे झाले असते असे मला वाटायला लागले. 

रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या हिने लिहलेल्या ‘स्टँडिग आॅन अ‍ॅप्पल बॉक्स’ या पुस्तकात तिच्या जीवनाशी निगडीत बºया-वाईट अनुभवांचे किस्से कथन केले आहेत. या पुस्तकासाठी सोनाक्षीने ऐश्वर्याचे अभिनंदन केले. ती म्हणाली, या पुस्तकाच्या माध्यमातून स्टारपुत्रांचे विचार या माध्यमातून जगासमोर येतील. 

सोनाक्षी सिन्हा सध्या नूर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्यात ती एका पत्रकाराच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. यावर्षी सोनाक्षीचे अकिरा व फोर्स २ हे चित्रपट रिलीज झाले असून तिच्या अ‍ॅक्शन अवताराची चांगलीच प्रशंसा झाली होती. 

Web Title: When will this dream of Sonakshi be fulfilled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.