‘तुम कहां हो?’ ‘मैं हमेशा तुम्हारे साथ हूं ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:36 IST2016-03-26T00:17:34+5:302016-03-25T21:36:42+5:30
बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड(?) अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे सगळेच हैरान आहेत. दोघांनीही ब्रेकअपच्या बातमीला ...
.jpg)
‘तुम कहां हो?’ ‘मैं हमेशा तुम्हारे साथ हूं ’
तिच्या आधी सुशांतने ‘भीड मे तन्हा हूं, तुम कहां हो??’ असे टिष्ट्वट केले होते.Don't feel alone I m always there in ur heart ,in ur life ❤️@itsSSR— ❤️Ankita lokhande (@anky1912)
Alone in the crowd..!! Where are you ..? pic.twitter.com/A5qdM1GTIa— Sushant S Rajput (@itsSSR)
.....................................
सुशांत-अंकिताचे ब्रेकअप?
सध्या मीडियात बॉलिवूड ब्रेकअपच्या बातम्यांचे चर्वितचर्वण सुरु आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अधुना यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या आल्या. आता यात आणखी एका जोडप्याचे नाव जोडले गेलेयं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या ‘बिनधास्त’ जोडप्याचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे. गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये होते. मात्र आता सहा वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे. सुशांतने अंकितासोबत राहत असलेले घर सोडले असून एका पंचतारांकित हॉटेलात मुक्काम हलवला आहे.अलीकडे सुशांतच्या वाढदिवसालाही अंकिता नव्हती, हे बघून अनेकांना दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली होती. आता खरे काय नि खोटे काय, हे अंकिता आणि सुशांत हे दोघेच जाणोत.