कुठे गायब झालीये स्नेहा उल्लाल?; ऐश्वर्याची कार्बनकॉपी म्हणून एकेकाळी झाली होती लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:02 PM2023-12-18T12:02:47+5:302023-12-18T12:03:20+5:30

Sneha ullal: मध्यंतरी स्नेहाचा एक सिनेमा रिलीज झाला होता. परंतु, दरवेळीप्रमाणे तिचा हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपटला. तेव्हापासून ती इंडस्ट्रीमधून गायब झाली आहे.

where-is-aishwarya-rais-lookalike-sneha-ullal-and-what-is-she-doing-now-a-days | कुठे गायब झालीये स्नेहा उल्लाल?; ऐश्वर्याची कार्बनकॉपी म्हणून एकेकाळी झाली होती लोकप्रिय

कुठे गायब झालीये स्नेहा उल्लाल?; ऐश्वर्याची कार्बनकॉपी म्हणून एकेकाळी झाली होती लोकप्रिय

ऐश्वर्या रायची (aishwarya rai) कार्बन कॉपी म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा उल्लाल (sneha ullal). सलमान खानच्या (salman khan) 'लकी- नो टाइम फॉर लव' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या स्नेहाने काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे स्नेहा सध्या काय करते, कशी दिसते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. म्हणूनच, सध्या ती काय करते हे जाणून घेऊयात.

लकीनंतर स्नेहा 'आर्यन', 'जाने भी दो यारो', 'क्लिक' यांसारख्या सिनेमांत झळकली. त्यानंतर अलिकडेच ती लव यू लोकतंत्र या सिनेमात दिसली होती. लव यू लोकतंत्र हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज झाला. मात्र, या सिनेमातही तिची जादू फारशी चालली नाही. त्यामुळे स्नेहा एकप्रकारे लोकांच्या विस्मरणात गेली आहे.

सलमान खानने दिला पहिला ब्रेक

१८ डिसेंबर १९८७ मध्ये मस्कतमध्ये स्नेहाचा जन्म झाला. वयाच्या १८ व्या वर्षी स्नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. मात्र, तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. स्नेहा, ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी असल्याचं अनेकांनी म्हटलं. स्नेहाने बॉलिवूडमध्ये काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. त्यामुळे तिने तिचा मोर्चा दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळवला. मात्र, तिथेही तिच्या पदरात अपयशच आलं.

आजारपणामुळे झाली इंडस्ट्रीपासून दूर

२०१५ मध्ये स्नेहाने अचानकपणे इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला. एका मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण सांगितलं. ऑक्टोइम्यून डिसऑर्डर या आजारामुळे स्नेहा जवळपास ४ वर्ष अंथरुणाला खिळून होती. हा एक रक्ताशी संबंधित आजार आहे. ज्यामुळे तिला तिच्या पायावरही उभं राहता येत नव्हतं. या आजारावर मात करत स्नेहाने २०२२ मध्ये  लव यू लोकतंत्र या सिनेमातून पुन्हा इंडस्ट्रीत एन्ट्री केली. परंतु, तिचा हा सिनेमाही सरासरी चालला.

सध्या काय करते स्नेहा उल्लाल?

स्नेहाने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली असून सध्या ती तिचं आयुष्य एन्जॉय करत आहे. स्नेहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 833k फॉलोअर्स आहेत. त्यामुळे  या चाहत्यांच्या ती कायम संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करत असते.

Web Title: where-is-aishwarya-rais-lookalike-sneha-ullal-and-what-is-she-doing-now-a-days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.