प्रसिद्ध कॉमेडियन गुड्डु मारुती प्रसिद्धीपासून कोसो दूर,बॉलिवूडमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:33 PM2022-07-18T18:33:01+5:302022-07-18T18:36:46+5:30

९० च्या दशकात आपल्या धमाकेदार कॉमेडीसाठी ओळखली जाणारी गुड्डी मारुती आता अभिनय जगतापासून दूर आहे. अभिनयापासून दुरावलेल्या गुड्डी मारुतीचा लूकही खूप बदलला आहे.

Where Is Popular Comedian Guddi Maruti Then And Now | प्रसिद्ध कॉमेडियन गुड्डु मारुती प्रसिद्धीपासून कोसो दूर,बॉलिवूडमधून आहे गायब

प्रसिद्ध कॉमेडियन गुड्डु मारुती प्रसिद्धीपासून कोसो दूर,बॉलिवूडमधून आहे गायब

googlenewsNext

स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. कालांतराने याच कलाकारांचा रसिकांनाही विसर पडतो.

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार दीर्घकाळापासून लोकांचे मनोरंजन करत आहेत.मात्र असे मोजकेच कलाकार आहेत जे आजही रसिकांची मनोरंजन करत आहेत. मात्र काही कलाकार आज अभिनयक्षेत्रापासून दुरावले आहेत.अभिनय कौशल्य आणि आपल्या अचुक कॉमेडी टाइमिंगने रसिकांची मनं जिंकणारी गुड्डी मारुती. गुड्डी मारुती आजही तिच्या कॉमेडीमुळे रसिकांच्या स्मरणात आहे. ९० च्या दशकात आपल्या धमाकेदार कॉमेडीसाठी ओळखली जाणारी गुड्डी मारुती आता अभिनय जगतापासून दूर आहे. अभिनयापासून दुरावलेल्या गुड्डी मारुतीचा लूकही खूप बदलला आहे.आता तिचा नवीन लूक पाहून अनेकांना तिची ओळखही पटणार नाही इतका तिच्यात कायापालट झाला आहे. 

वयाच्या १० व्या वर्षीच तिने अभिनयाला सुरुवात केली होती.'जान हाज़िर हैं' या सिनेमामध्ये गुड्डी एक बालकलाकार म्हणून दिसली होती. या भूमिकेनंतर  तिने १०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले. विशेष म्हणजे गुड्डी इतकी जाड असून देखील तिची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही.'दूल्हे राजा', 'बीवी नंबर वन', 'बरसात की एक रात', 'खिलाड़ी', 'शोला और शबनम' आणि 'आशिक अवारा' सिनेमातल्या तिच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या.

आता गुड्डी मारुती  लाइमलाइटपासून दूर राहून आपले खासगी आयुष्य एन्जॉय करतेय.अधून मधून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात. आता तिच्यात प्रचंड बदल झाला असून नवीन लूकमध्ये तिला ओळखणंही अशक्यच.गुड्डी मारुतीने व्यापारी अशोकसोबत लग्न केले आहे.दोघेही मुंबईतील ब्रांदा येथे राहतात. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करत असते.
 

Web Title: Where Is Popular Comedian Guddi Maruti Then And Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.