​- तर तयार असा यामी व हृतिकसोबत थिरकायला...येतेय ‘Mon Amour’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 11:48 AM2017-01-03T11:48:53+5:302017-01-03T11:54:40+5:30

‘काबील’चा ट्रेलर, त्याची आत्तापर्यंत रिलीज झालेली तीन गाणी असे सगळेच लोकांना आवडले. ‘काबील’चे पहिले गाणे ‘कुछ दिन’ लोकांच्या ओठांवर ...

- While preparing for a walk with Yamani and Hrithik ... 'Mon Amour' | ​- तर तयार असा यामी व हृतिकसोबत थिरकायला...येतेय ‘Mon Amour’

​- तर तयार असा यामी व हृतिकसोबत थिरकायला...येतेय ‘Mon Amour’

googlenewsNext
ाबील’चा ट्रेलर, त्याची आत्तापर्यंत रिलीज झालेली तीन गाणी असे सगळेच लोकांना आवडले. ‘काबील’चे पहिले गाणे ‘कुछ दिन’ लोकांच्या ओठांवर आहे. ‘काबील हू’ हे टायटल साँग आणि ‘हसीनों का दिवाना’ हे टायटल साँगही लोकप्रीय झाले. आता ‘काबील’चे चौथे गाणेही लवकरच रिलीज होणार आहे.‘Mon Amour’ असे या गाण्याचे शब्द आहेत. ‘Mon Amour’ हे फ्रेंच शब्द आहेत. याचा अर्थ ‘माय डार्लिंग आॅर माय डिअर वन’. हे गाणे म्हणजे धम्माल डान्स नंबर असणार आहे आणि म्हणून त्यावर तुम्ही थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. 

काबीलचा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट आठवेल. ती म्हणजे, यात एका दृश्यात हृतिक रोशन यामीला हवेत लिफ्ट करतो. ही लिफ्ट याच गाण्यातील. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी या गाण्यात अगदी बेधुंद डान्स केलाय. खरे तर यामी व हृतिक दोघेही चित्रपटांत अंध आहेत. त्यामुळेच हे गाणे सर्वार्थाने विशेष आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन अंध प्रेमीअगदी ‘छप्पर फाड’ डान्स करत असताना आपल्याला यात पाहायला मिळणार आहे. आहे ना इंटरेस्टिंग!



तुम्ही डान्सचे ‘दिवाने’ असाल तर खात्रीपूर्वक तुम्ही या गाण्याची अगदी आतुरतेने प्रतीक्षा करणार. केवळ या गाण्यावर थिरकता येणार म्हणून नव्हे तर हृतिकच्या काही  ‘युनिक’ डान्स मुव्ह बघता येणार म्हणूनही अनेकांना या गाण्याची प्रतीक्षा असणार. बºयाच दिवसांपासून डान्स फ्लोरवर हृतिकची एनर्जी दिसली नाही. आता या गाण्यात हृतिकची ही एनर्जी तुम्हा-आम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा गेट रेडी फॉर ‘‘Mon Amour’...’
 

Web Title: - While preparing for a walk with Yamani and Hrithik ... 'Mon Amour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.