कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:33 PM2021-12-12T17:33:54+5:302021-12-12T17:34:25+5:30

katrina kaif: सध्या कतरिनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून तिच्या मेहंदीमध्ये विकीसाठी एक खास मेसेज लिहिण्यात आला होता.

who is bollywood favourite mehendi artist veena nagda katrina kaif vicky kaushal wedding | कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif) या जोडीचा बहुप्रतिक्षीत ठरलेला लग्नसोहळा अखेर ९ डिसेंबरला पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याची सध्या सर्व स्तरांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यातच विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यामध्येच सध्या कतरिनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून तिच्या मेहंदीमध्ये विकीसाठी एक खास मेसेज लिहिण्यात आला होता. तेव्हापासून कतरिनाच्या हातावर ही सुंदर मेहंदी नेमकी कोणी काढली याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

राजस्थानमधील माधोपूर येथील एका आलिशान राजवाड्यात विकी -कतरिनाचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात मेहंदीपासून ते हळदीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. सध्या या लग्नसोहळ्यातील फोटो समोर येत असून  सगळीकडे कतरिनाच्या मेहंदीची चर्चा रंगली आहे. कतरिनाने केवळ मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च केल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर कतरिनासाठी खास सोजत मेहंदी मागवण्यात आली होती. परंतु, कतरिनाला ही मेहंदी नेमकी काढली कोणी हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्टने काढली कतरिनाच्या हातावर मेहंदी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा (veena nagda) यांनी कतरिनाच्या हातावर मेहंदी काढली आहे. वीणा नागदा हे नाव कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय असून आजपर्यंत त्यांनी अनेक सेलिब्रिटींच्या हातावर मेहंदी काढली आहे. इतकंच नाही तर जवळपास ३५ वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. 
 

विदेशातही खास मेहंदीसाठी येतं बोलावणं

वीणा नागदा या बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच विदेशातही लोकप्रिय आहेत. अनेकदा त्यांना खास मेहंदी काढण्यासाठी विदेशात बोलवण्यात येतं. आतापर्यंत त्यांनी बाली, बँकॉक, हाँगकाँग, मलेशिया, जर्मनी, लंडन, युएसए यांसारख्या देशांमध्ये जाऊन ब्राइडल मेहंदी काढल्या आहेत.

चित्रपटांसाठीही मेहंदी आर्टिस्ट म्हणून करतात काम

आतापर्यंत वीणा नागदा यांनी काही चित्रपटांसाठीही काम केलं आहे. चित्रपटांमध्ये लग्नसोहळा किंवा कोणताही कार्यक्रमाचा सीन असेल तर त्यात अभिनेत्रींच्या हातावर वीणा नागदाच मेहंदी काढतात.  वीणा या ब्राइडल मेहंदी, नेल पॉलिश मेहंदी, हिरे-मोती, अरेबिक, स्टोन, सीक्वन, बीड्स, डायमंड या मेहंदी प्रकारात एक्स्पर्ट आहेत.

किती आहे वीणा नागदा यांचं मानधन

वीणा नागदा यांनी कतरिनापूर्वी दीपिका पदुकोण, शिल्पा शेट्टी, इशा देओल, लिज हर्ले, ट्विंकल खन्ना, श्वेता बच्चन, काजोल, नेहा धुपिया, नताशा दलाल अशा कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आणि सेलिब्रिटींच्या हातावर ब्राइडल मेहंदी काढून दिली आहे. वीणा नागदा यांचं मानधन ११ हजारांपासून सुरु होतं. मेहंदीच्या डिझाइन नुसार त्यांच्या मानधनात वाढ होते.

कतरिनाने मेहंदीसाठी किती रुपये खर्च केले? 

कतरिनाच्या हातावर वीणा नागदा यांनी ब्राइडल मेहंदी काढली असून या संपूर्ण मेहंदी सोहळ्यासाठी कतरिनाने जवळपास १ लाख रुपये खर्च केले आहेत. कतरिनासह तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मेहंदी लावण्यासाठी जवळपास २० किलो मेहंदी मागवण्यात आली होती. तसंच कतरिनाच्या हातावर खास सोजत मेहंदी लावण्यात आली.
 

Web Title: who is bollywood favourite mehendi artist veena nagda katrina kaif vicky kaushal wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.