चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 17:33 IST2021-12-29T16:49:43+5:302021-12-29T17:33:53+5:30
सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टारकिड्सची धूम आहे.मोठ्या मुलांसोबतच लहान मुलांचेही फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात.

चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा
सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टारकिड्सची धूम आहे.मोठ्या मुलांसोबतच लहान मुलांचेही फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात. त्यांचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत.असाच एका स्टारकिड्सचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)च्या मांडीवर बसलेली ही गोंडस चिमुरडी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे?, या प्रश्नाचे उत्तर आहे आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड चर्चेत आहे. या फोटोमध्ये बसलेल्या या गोंडस मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो बघून ही नक्की कुणाची मुलगी आहे याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागली आहे. ही गोड मुलगी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनानी सामीची आहे. अदनानी सामी(Adnan Sami) ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केला आहेत. अदनान सामीच्या मुलीचे नाम मेडिना सामी आहे. हा फोटो शेअर करताना अदनान सामीने लिहिले, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा संपूर्ण जग तुमच्यासोबत हसते...या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
हा फोटो नुकताच रिलीज झालेल्या '८३' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचा आहे. यावेळी मेडिना तिच्या आई-वडिलांसोबत प्रीमियरल आली होती. व्हाईट रंगाचा फ्रॉक आणि निळ्या रंगाची हॅटमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.