'द फॅमिली मॅन'मधील खतरनाक दहशतवादी मूसा रहमान आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:30 IST2021-05-27T18:29:38+5:302021-05-27T18:30:13+5:30
'द फॅमिली मॅन'चा दुसरा सीझन ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'द फॅमिली मॅन'मधील खतरनाक दहशतवादी मूसा रहमान आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल
मनोज वाजपेयीची लोकप्रिय वेबसीरिज 'द फॅमिली मॅन'चा दुसरा सीझन ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या सीझनमधील स्टोरी आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. पहिल्या भागात मनोज वाजपेयीने साकारलेला श्रीकांत तिवारीसोबत आणखी एका पात्राने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ते पात्र म्हणजे मूसा रहमान. ही भूमिका साकारली होती नीरज माधवने.
द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या भागात मूसा रहमान दिसणार की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नवीन सीझनची एक व्हिडीओ क्लिप रिलीज करण्यात आली आहे, ज्यात नीरज माधवदेखील कमबॅक करणार असल्याची हिंट देतो आहे.
अभिनेता नीरज माधव मल्याळम सिनेमांसाठी ओळखला जातो. अभिनेता व्यतिरिक्त तो एक रॅपर आणि एक उत्तम डान्सर देखील आहे. तो एक प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर आहे. नीरजने २०१३ साली ‘बडी’ या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्याने अनेक मल्याळम चित्रपटात काम केेल आहे.
फॅमिली मॅनच्या पहिल्या सीझनमध्ये, नीरज माधवच्या मोशे रहमानच्या व्यक्तिरेखेने चांगलीच लोकप्रियता मिळवली. हिंदी प्रेक्षकांमध्ये त्याला ओळख मिळाली.
नीरज माधवच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्याने एप्रिल २०१८ मध्ये त्याची मैत्रीण दीप्तीसोबत लग्न केले. दीप्ती कोची येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
आता द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझन रिलीज झाल्यावर यात नीरज माधव पहायला मिळतो की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.