दीपिका पादुकोणला कुणामुळे मिळाला पहिला ब्रेक? जाणून घ्यायचंय मग वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 03:36 PM2017-01-05T15:36:28+5:302017-01-05T15:36:28+5:30

दीपिका पादुकोण ही ‘बी टाऊन’च्या सर्वांत महागड्या नायिकांपैकी एक मानली जाते. तिचा अभिनय, सौंदर्य, हॉट-सेक्सी अंदाज यांच्यामुळे तिने हॉलिवूडमध्येही ...

Who got the first break from Deepika Padukone? Read on to know. | दीपिका पादुकोणला कुणामुळे मिळाला पहिला ब्रेक? जाणून घ्यायचंय मग वाचा..

दीपिका पादुकोणला कुणामुळे मिळाला पहिला ब्रेक? जाणून घ्यायचंय मग वाचा..

googlenewsNext
पिका पादुकोण ही ‘बी टाऊन’च्या सर्वांत महागड्या नायिकांपैकी एक मानली जाते. तिचा अभिनय, सौंदर्य, हॉट-सेक्सी अंदाज यांच्यामुळे तिने हॉलिवूडमध्येही डेब्यू केलाय. ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला मागे सारत तिने अलीकडेच आशियातील सर्वांत सेक्सी महिला बनण्याचा सन्मान पटकावला. तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण, तुम्हाला माहितीये का ‘हिट पे हिट’ देणाऱ्या  दीपिका पादुकोणची बॉलिवूड एन्ट्री कुणामुळे झाली ते? होय, गायक, अभिनेता हिमेश रेशमिया याच्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला आहे.

आता तुम्ही म्हणाल, फराह खानने दीपिकाला ‘ओम शांती ओम’ मध्ये मुख्य भूमिकेसाठी घेतले होते. मग त्यात हिमेशचा काय रोल? पण, हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा...’ या अल्बममध्ये दीपिकाने भूमिका केली होती. फराहने हाच अल्बम पाहिला अन् तिला ‘ओम शांती ओम’ मध्ये डिप्पीला मुख्य भूमिकेसाठी घ्यावेसे वाटले. हिमेशचा हा म्युझिक अल्बम दीपिकासाठी ‘लकी’ ठरला असेच म्हणावे लागेल. डेब्यू चित्रपट आणि तो ही शाहरूख खानसोबत? ‘ओम शांती ओम’ च्या माध्यमातून दीपिकाची बॉलिवूडमध्ये एकदम धमाकेदार एन्ट्री झाली. 

दीपिका ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून, तिच्या करिअरची सुरूवात बॅडमिंटनपटू म्हणून झाली. ती राज्य पातळीवर बॅडमिंटनच्या मॅचेस खेळली. तसेच राष्ट्रीय पातळीवरही तिचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट झाले होते. आठव्या वषार्पासून तिने जाहिरातींमध्ये काम करायला सुरूवात केली होती. दहावी नंतर तिने मॉडेलिंग या करिअरविषयी गंभीरपणे विचार करायला सुरूवात केली. 

Web Title: Who got the first break from Deepika Padukone? Read on to know.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.