Laal Singh Chaddha : कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:00 AM2022-06-01T08:00:00+5:302022-06-01T08:00:02+5:30

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंह चड्ढा’ची जोरदार चर्चा आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, या चित्रपटातील बालकलाकाराची. होय, आमिरच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Who is Ahmad Ibn Umar? Young Aamir khan in Laal Singh Chaddha | Laal Singh Chaddha : कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा

Laal Singh Chaddha : कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा

googlenewsNext

आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. रविवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, या चित्रपटातील बालकलाकाराची. होय, आमिरच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हा चिमुकला कोण? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत.
या चिमुकल्याचं नाव अहमद इब्न उमर (Ahmed Ibn Umar) आहे.

तो  श्रीनगरमधील जलदगरचा रहिवासी आहे.   अहमद आता चौथीत आहे. तो श्रीनगरमधील टिंडेल बिस्को स्कूलमध्ये शिकतो. अहमदला शिक्षण पूर्ण करून पूर्णवेळ अभिनयात करिअर करायचं आहे. त्याचे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे.  वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने अभिनयास सुरूवात केली. ऐकून आश्चर्य वाटेल पण क्युट चेहºयाच्या अहमदला इतक्या लहान वयातही अनेक नकार पचवावे लागलेत. त्याने डझनभर आॅडिशन दिले. अनेकवेळा त्याला नकाराचा सामना करावा लागला. अनेक जाहिराती, म्युझिक व्हिडिओमध्ये झळकल्यानंतर अखेर ‘नोटबुक’ या चित्रपटात त्याला संधी मिळाली.  या चित्रपटात त्याने कॅप्टन कबीर कौल यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे.  

अहमदला ‘लाल सिंह चड्ढा’साठी सुद्धा ऑडिशन द्यावी लागली. आमिर खान त्याच्या बालपणीच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधत असल्याचं त्याला कळलं. यानंतर अहमदने ई-ऑडिशन दिली आणि त्याची निवड झाली. यानंतर त्याच्या अनेक कार्यशाळा, मुलाखती झाल्या. त्यानंतर कुठे या चित्रपटासाठी त्याचं नाव फायनल झालं.  
 आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.   हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.  

Web Title: Who is Ahmad Ibn Umar? Young Aamir khan in Laal Singh Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.