कमाईमध्ये अक्षयवर मात करते त्याची धाकटी बहीण; १५ वर्षांनी मोठ्या उद्योगपतीशी केलंय लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:15 AM2022-06-22T11:15:00+5:302022-06-22T11:15:00+5:30
Akshay kumar: जवळपास अक्षयचं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात असतं. मात्र, या झगमगाटापासून त्याची एक बहीण कायम दूर असते. विशेष म्हणजे आज कोटयवधींचा बिझनेस एकटी सांभाळणारी ही बहीण नेमकी कोण ते पाहुयात.
सोशल मीडियावर अनेकदा कलाकार मंडळींच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार तर कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) याची चर्चा रंगली आहे. अक्षयने नुकतीच त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अनेक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहेत. मात्र, त्यासोबतच अक्षयच्या रिअल लाइफ बहिणीचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. त्याची खऱ्या आयुष्यातील बहिणी कोण, ती काय करते असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळे आज त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
जवळपास अक्षयचं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात असतं. मात्र, या झगमगाटापासून त्याची एक बहीण कायम दूर असते. विशेष म्हणजे आज कोटयवधींचा बिझनेस एकटी सांभाळणारी ही बहीण नेमकी कोण ते पाहुयात. अक्षयच्या सख्या बहिणीचं नाव अलका भाटिया असं असून ती अक्षयची धाकटी बहीण आहे. विशेष म्हणजे संपत्तीच्या बाबतीत अलका अक्षयवरही मात करते.
अक्षयपेक्षा लहान असलेल्या अलकाने प्रसिद्ध व्यावसायिक सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबत लग्न केलं आहे. सुरेंद्र यांच नाव भारतातल्या श्रीमंताच्या यादीत टॉप १०० मध्ये घेतलं जातं. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अलकाने सुरेंद्र यांच्याशी लग्न केलं. परंतु. या लग्नाला खिलाडी कुमारचा विरोध असल्याचं म्हटलं जातं. अलका, सुरेंद्र यांच्यापेक्षा जवळपास १५ वर्षांनी लहान आहे.
अलकाचं पहिलं लग्न झालं होतं. तिला एक मुलगीदेखील आहे. परंतु, वयाच्या चाळीसाव्या वर्षी तिने पुन्हा दुसरा संसार थाटाचा निर्णय घेतला. वयाच्या चाळीशीत दुसरे लग्न करण्याचा अलकाचा निर्णय अक्षयला मान्य नव्हता. इतकेच काय तर सुरेंद्र यांनाही पहिल्या लग्नापासून तीन मुली आहते. परंतु, बहिणीच्या हट्टापुढे त्याला झुकावं लागलं.
दरम्यान, अलका भाटिया स्वतः निर्माती आहे.२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'फगली' सिनेमाची निर्माती ती होती. अलका आणि अक्षय एकाच इमारतीत राहतात.