ईशा देओलचे वडील कोण?, मिळालं हे उत्तर, ऐकून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:56 PM2023-07-12T16:56:34+5:302023-07-12T16:57:03+5:30

रिअ‍ॅलिटी शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Who is Esha Deol's father? Everyone was shocked to hear this answer | ईशा देओलचे वडील कोण?, मिळालं हे उत्तर, ऐकून सगळेच झाले हैराण

ईशा देओलचे वडील कोण?, मिळालं हे उत्तर, ऐकून सगळेच झाले हैराण

googlenewsNext

रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक वेळा स्पर्धक अशा गोष्टी बोलतात की त्यांच्या उत्तराने लोकांची झोप उडते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रोडीजचा आहे ज्यामध्ये ईशा देओल, करण कुंद्रा, रणविजय आणि विजेंदर सिंग हे टोळीचे नेते आहेत. व्हिडिओमध्ये एक स्पर्धक शोच्या ऑडिशनसाठी आली होती. या दरम्यान सर्व परिक्षकांनी प्रथम त्या स्पर्धकाला सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले. पण ती कोणतेच उत्तर देऊ शकली नाही. यानंतर, त्या स्पर्धकाला ईशा देओलच्या वडिलांचे नाव विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात तिने असे नाव घेतले की करण कुंद्रा आणि रणविजय आणि अगदी ईशा देओललाही ऐकून हसू आवरलं नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये इशिका नावाची मुलगी ऑडिशनसाठी आल्याचे तुम्हाला दिसेल. रणविजय आणि करण कुंद्रा प्रथम सामान्य ज्ञानापासून इशिकाला सोपे प्रश्न विचारतात. जसे की दारू पिण्याचे योग्य वय काय आहे? लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांचे कायदेशीर वय किती आहे? भारतात किती राज्ये आहेत? भारताच्या राष्ट्रपतींचे नाव काय आहे? भारताची राजधानी कोणती आहे? टोळीचा म्होरक्या इशिकाला हे प्रश्न विचारत राहिला, पण ती एकाही प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकली नाही. तिचे ज्ञान शून्य आहे आणि सध्या ती खूप गोंधळलेली आहे, असे ती सांगत राहिली.

जेव्हा इशिका सर्व प्रश्नांची चुकीची उत्तरे देत होती तेव्हा रणविजय आणि करणने लगेचच इशिकाला ईशा देओलच्या वडिलांचे नाव विचारले. वेळ न घालवता इशिका पटकन सनी देओलचे नाव घेते. हे ऐकून रणविजय आणि करण देओल हसले. त्याच वेळी, ईशा देओल देखील तिच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि हसायला लागते. रोडीजचा हा व्हिडिओ खूप जुना आहे पण तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

Web Title: Who is Esha Deol's father? Everyone was shocked to hear this answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.