घटस्फोटानंतर संजय दत्त पुरवतो दुसऱ्या पत्नीचे लाड?; आजही तिच्या शॉपिंगवर करतो खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:01 PM2023-10-15T13:01:10+5:302023-10-15T13:01:36+5:30
Sanjay dutta: रियाने संजयला घटस्फोट दिल्यानंतर टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (sanjay dutta) यांच्या फिल्मी लाइफपेक्षा त्याची प्रोफेशनल लाइफ कायम चर्चिली गेली. यात खासकरुन त्याच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगताना दिसते. संजय दत्तने आजवर तीन वेळा संसार थाटला. मात्र, दोन वेळा त्याला अपयश आलं. विशेष म्हणजे संजयने त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. मात्र, तरीदेखील तो आजही तिचे हट्ट पुरवताना दिसतो.
संजय दत्तने अभिनेत्री रिचा शर्मा हिच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, कर्करोगामुळे रिचा हिचं निधन झालं. रिचा हिचं निधन झाल्यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. संजयची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे तो रियाला वेळ देऊ शकत नव्हता. याच कारणामुळे या जोडीत वाद होऊ लागले आणि ते विभक्त झाले. त्यानंतर संजयने तिसरं लग्न केलं. विशेष म्हणजे तिसरं लग्न केल्यानंतरही तो रियाला अजूनही खरेदीसाठी पैसे देत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याने घटस्फोटाच्यावेळी रियाला अमाप संपत्तीदेखील दिली होती.
रिया आणि संजयचा घटस्फोट झाला त्यावेळी संजयने रियाला एक आलिशान घर, एक होंडा सीटी कार, आणि आठ कोटी रुपये इतकी संपत्ती पोटगी म्हणून दिली होती. तरीदेखील आजही तो तिच्या शॉपिंगसाठी खर्च करतो. दरम्यान, रियाने संजयनंतर टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचाही संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. रिया तिच्या मुलीसोबत राहत असून ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.