कोण आहे सान्या मल्होत्राचा मिस्ट्री मॅन?, ज्याच्या प्रेमात पडलीय अभिनेत्री, एकत्र झाले स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:22 IST2025-01-09T13:21:26+5:302025-01-09T13:22:15+5:30

Sanya Malhotra : सान्या मल्होत्राचा अलिकडेच एक फोटो व्हायरल झाला होता. जो पाहून लोक ती प्रेमात पडली असल्याचे बोलत आहेत.

Who is Sanya Malhotra's mystery man? The actress is in love with him, they were spotted together | कोण आहे सान्या मल्होत्राचा मिस्ट्री मॅन?, ज्याच्या प्रेमात पडलीय अभिनेत्री, एकत्र झाले स्पॉट

कोण आहे सान्या मल्होत्राचा मिस्ट्री मॅन?, ज्याच्या प्रेमात पडलीय अभिनेत्री, एकत्र झाले स्पॉट

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​हिने आपल्या चित्रपटांनी लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच तिने सुनिधी चौहानच्या 'आँख' म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्या डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना प्रभावित केले. सान्याला तिचे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक ठेवणे आवडते. ती सिंगल आहे. पण अलीकडेच तिचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यानंतर लोकांना वाटू लागले की ती आता प्रेमात पडली आहे.

सान्या मल्होत्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सितार वादक आणि गायक ऋषभ रिखीराम शर्मासोबत दिसत आहे. दोघांच्या एकत्र या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फोटोमध्ये ती ऋषभच्या जवळ उभी असलेली दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते तर्क लावत आहेत की, ते दोघे डेट करत आहेत. या फोटोनंतर एका इव्हेंटमधील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. दोघांनी एकत्र प्रोग्राम अटेंड केला होता. त्यामुळे ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत, असे चाहते म्हणत आहेत.

चाहते म्हणाले - छान जोडी आहे...
एका Reddit युजरने लिहिले, 'मला फक्त सान्या आनंदी हवी आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ते डेटिंग करत असतील तर ते चांगले आहे. दोघेही प्रतिभावान आहेत.' एक म्हणाला, 'तो सहसा तिच्या पोस्टवर कमेंट करतो आणि तिलाही त्याच्या पोस्ट आवडतात. ते एकत्र छान दिसतात.’’

कोण आहे ऋषभ रिखीराम शर्मा?
ऋषभ रिखीराम शर्मा हे पंडित रविशंकर यांचे शिष्य आहेत. प्रसिद्ध वाद्य निर्मात्यांच्या कुटुंबातून आलेला आणि पंडित रविशंकर यांचा सर्वात तरुण शिष्य म्हणून वाढलेला ऋषभचा संगीतमय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ऋषभ, ज्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या दिवाळी सोहळ्यातही सादरीकरण केले, जिथे त्याने ह्यूस्टन, टेक्सास येथील एनजीआर स्टेडियममध्ये ६००००हून अधिक थेट प्रेक्षक आणि ५०० मिलियन घरात असलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या वर्षी त्याने 'सितार फॉर मेंटल हेल्थ' या संगीत सीरिजसाठी प्रसिद्धी मिळवली होती. त्याने चेन्नई, जयपूर, गोवा, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांना चकित केले आहे.

Web Title: Who is Sanya Malhotra's mystery man? The actress is in love with him, they were spotted together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.