'मेलोडी क्वीन' श्रेया घोषालचा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:57 AM2024-06-25T11:57:53+5:302024-06-25T11:58:30+5:30

सुमधुर गळा लाभलेली श्रेया 'मेलडी क्वीन' म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

Who Is Shiladitya Mukhopadhyaya Shreya Ghoshal Husband Global Head Of Rs 1406 Crore Truecaller Know About His Career Education | 'मेलोडी क्वीन' श्रेया घोषालचा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या...

'मेलोडी क्वीन' श्रेया घोषालचा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या...

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.  सुमधुर गळा लाभलेली श्रेया 'मेलडी क्वीन' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. श्रेया घोषाल तिच्या मधुर आणि अप्रतिम आवाजासाठी ओळखली जाते. श्रेयाने अनेक भाषांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले आहेत.  पण, तुम्हाला माहिती आहे का सर्वांच्या लाडक्या श्रेयाचा नवरा नेमकं काय करतो आणि कुठे राहतो. तर याबद्दल जाणून घेऊया.

 श्रेया घोषालचे पती शिलादित्य मुखोपाध्याय लोकप्रिय कॉलर आयडी आणि स्पॅम-ब्लॉकिंग ॲप Truecaller मध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत.  शिलादित्य एप्रिल 2022 पासून ट्रूकॉलर फॉर बिझनेसचे ग्लोबल हेड म्हणून कंपनीत काम करत आहेत. Truecaller चे मुख्यालय स्टॉकहोममध्ये आहे.

 2009 मध्ये लाँच झालेल्या या ॲपने जानेवारी-डिसेंबर 2023 तिमाहीत 1,740.4 million SEK  (सुमारे 1406 कोटी रुपये) कमाई केली होती. या ॲपचे जगभरात दर महिन्याला 374 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. Truecaller हे कॉलर आयडी विभागात वर्चस्व गाजवते आणि जागतिक विक्रीत भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

शिलादित्य मुखोपाध्याय यांनी Truecaller पूर्वी, त्यांनी CleverTap या कॅलिफोर्नियास्थित आघाडीच्या SaaS कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर काम केले. शिलादित्य यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर पदवी मिळवली आहे. श्रेया घोषाल आणि शिलादित्य यांची लव्हस्टोरीदेखील खूप खास आहे. श्रेया आणि शिलादित्य हे बालपणीचे मित्र आहेत. 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2015 मध्ये त्यांचं लग्न झालं. 22 मे 2021 रोजी श्रेयाने एका मुलाला जन्म दिला.  त्याचे नाव देवयान असं आहे. 
 

Web Title: Who Is Shiladitya Mukhopadhyaya Shreya Ghoshal Husband Global Head Of Rs 1406 Crore Truecaller Know About His Career Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.